वृक्षलागवड मोहिमेचा फज्जा

राजेश प्रायकर
सोमवार, 23 जुलै 2018

नागपूर : महिनाभरात 50 हजार झाडे लावण्यासंदर्भात महापौर नंदा जिचकार यांनी केलेली घोषणा फोल ठरली. महिना संपुष्टात येत असताना केवळ पाच हजारांपर्यंतच झाडे लावण्यात आल्याचे सूत्राने नमूद केले. त्यामुळे नाग नदी स्वच्छता अभियानानंतर वृक्षलागवड मोहिमेचीही वाट लागल्याचे महापालिकेच्या आवारातच खोदलेले खड्डे वृक्षारोपणाशिवायच बुजल्याने अधोरेखित केले.

महापौर नंदा जिचकार यांनी 1 जुलैला वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात केली. पहिल्या दिवशी शहरात 1463 झाडे लावण्यात आली. मात्र, त्यानंतर वृक्षलागवड मोहिमेला वाऱ्यावर सोडण्यात आले. राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे 1 ते 31 जुलैपर्यंत मोहीम राबविणे अपेक्षित आहे. मात्र, शहरात 1 जुलै वगळता कुठेही महापालिकेकडून वृक्षारोपण करण्यात आले नाही. महापालिका प्रशासकीय इमारतीच्या पुढे वृक्षारोपणासाठी 1 जुलैला खड्डे खोदण्यात आले. मात्र, आज हे अकरा खड्डे बुजण्याच्या स्थितीत आले आहे. महापालिकेच्या आवारातच प्रशासन, पदाधिकाऱ्यांची उदासीनता पुढे आल्याने या मोहिमेचे बारा वाजल्याचे चित्र आहे. केवळ नगरसेवकांना त्यांच्या भागात वृक्षलागवडीचे आवाहन करण्यात आले होते. नगरसेवकांनी महापौरांचे हे आवाहन किती गांभीर्याने घेतले, हा संशोधनाचा मुद्दा असल्याचे एका अधिकाऱ्याने नमुद केले. आतापर्यंत जवळपास पाच हजार रोपटे लावण्यात आले असून 31 जुलैपर्यंत शिल्लक 45 हजार झाडे लावणे कठीण असल्याने या मोहिमेचा फज्जा उडणार, एवढे निश्‍चित दिसून यते आहे.
सामाजिक संघटनांची पाठ
महापौर नंदा जिचकार यांनी 29 जून तसेच 7 जुलैला सामाजिक संघटनांची बैठक आयोजित केली. परंतु या बैठकीत एकही प्रतिनिधी फिरकला नाही, असे सूत्राने नमूद केले. त्यानंतर महापौर, आयुक्तांना संवाद साधून मोहीम यशस्वी करण्याची संधी होती, परंतु पुरते दुर्लक्ष करण्यात आले.

महापालिकेने आतापर्यंत 23 हजार रोपटे लावली. 38 प्रभागातील नगरसेवकांना वृक्षलागवडीचे कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचनांसह रोपटे देण्यात आले असून 31 जुलैपर्यंत ही मोहीम आहे. इतर संस्थांना मात्र रोपटे देण्यात आले नाही.
- अमोल चौरपगार, उद्यान अधीक्षक, महापालिका.

Web Title: Nagpur nmc tree news