उद्यान विभाग, कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

नागपूर  रस्त्याच्या मधोमध कापलेल्या झाडाच्या खोडावर दुचाकी आदळल्याने एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदारावर गुन्हे दाखल केले. महिलेच्या मुलीने अपघाताची तक्रार मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे ट्‌विटरवरून केली होती. साधना शशिकांत पुराडभट (वय 53, रा. इंद्रप्रस्थनगरी, साई अपार्टमेंट, सोनेगाव) या 4 मार्चला रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास पतीसोबत दुचाकीने जात असताना आकाशवाणी चौकाकडून जीपीओकडे जाणाऱ्या रोडच्या मधोमध असलेल्या झाडाच्या खोडावर त्यांची दुचाकी आदळली. या अपघातात साधना गंभीर जखमी झाल्या होत्या.

नागपूर  रस्त्याच्या मधोमध कापलेल्या झाडाच्या खोडावर दुचाकी आदळल्याने एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदारावर गुन्हे दाखल केले. महिलेच्या मुलीने अपघाताची तक्रार मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे ट्‌विटरवरून केली होती. साधना शशिकांत पुराडभट (वय 53, रा. इंद्रप्रस्थनगरी, साई अपार्टमेंट, सोनेगाव) या 4 मार्चला रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास पतीसोबत दुचाकीने जात असताना आकाशवाणी चौकाकडून जीपीओकडे जाणाऱ्या रोडच्या मधोमध असलेल्या झाडाच्या खोडावर त्यांची दुचाकी आदळली. या अपघातात साधना गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचाराकरिता शुअरटेक हॉस्पिटल येथे भरती केले होते. उपचारादरम्यान डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सीताबर्डी येथे अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. आकाशवाणी चौक ते जीपीओ चौकादरम्यान जिल्हा न्यायालयासमोरील शिवमंदिरालगत कापलेल्या झाडाच्या खोडामुळे गाडी उसळल्याने पुराडभट दाम्पत्यांचा अपघात झाला होता. त्यातच साधना पुराडभट यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. या प्रकरणात आरोपी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणामुळे साधना शशिकांत पुराडभट या मरण पावल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी शशिकांत मधुकर पुराडभट (57) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिस ठाण्यात आरोपीविरुध्द कलम 304 (अ) भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला.

 

Web Title: Nagpur nmc tree news