नागपूरच्या प्रसिद्ध संत्राबर्फीत कृत्रिम रंगाचा वापर! तीन आस्थापनांचे परवाने रद्द, तुकाराम मुढेंच्या विभागाची कारवाई

FDA Suspends Licences of Three Food Establishments : अन्नपूर्णा फूड प्रॉडक्ट्स या कंपनीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरची संत्राबर्फी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Nagpur Orange Barfi Row

Nagpur Orange Barfi Row

esakal

Updated on: 

नागपूरची ओळख असलेल्या प्रसिद्ध संत्राबर्फीच्या गुणवत्तेबाबत गंभीर बाब समोर आली आहे. संत्राबर्फीमध्ये आरोग्यासाठी घातक ठरू शकणाऱ्या कृत्रिम रंगाचा वापर केल्याचं अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) प्रयोगशाळेतील तपासणीत उघड झालं आहे. यानंतर प्रशासनाने संबंधित उत्पादक कंपनीवर कारवाई केली आहे. अन्नपूर्णा फूड प्रॉडक्ट्स या कंपनीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरची संत्राबर्फी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...