नागपूर @45.4 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

ढगाळ वातावरणाने थोडाफार दिलासा दिल्यानंतर विदर्भात अपेक्षेप्रमाणे पुन्हा उन्हाची तीव्र लाट उसळली. उन्हाच्या तडाख्यामुळे नागपूरचा पारा अर्ध्या अंशाने चढून तापमान 45.4 अंशांवर गेले.

नागपूर - ढगाळ वातावरणाने थोडाफार दिलासा दिल्यानंतर विदर्भात अपेक्षेप्रमाणे पुन्हा उन्हाची तीव्र लाट उसळली. उन्हाच्या तडाख्यामुळे नागपूरचा पारा अर्ध्या अंशाने चढून तापमान 45.4 अंशांवर गेले. उष्णतेची लाट किमान आठवडाभर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

राजस्थानकडून येणाऱ्या कोरड्या हवेमुळे नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी उन्हाचे तीव्र चटके जाणवले. गुरुवारी 45 अंशांवर गेलेला नागपूरचा पारा आज आणखी चढून 45.4 अंशांवर सरकला. चंद्रपूर येथे 45.8 अंशांची नोंद करण्यात आली. येथील कमाल तापमान विदर्भासह संपूर्ण राज्यात सर्वाधिक ठरले. ब्रह्मपुरी (45.6 अंश सेल्सिअस), वर्धा (44.9 अंश सेल्सिअस) आणि गडचिरोली (44.8 अंश सेल्सिअस) येथेही उन्हाचा तडाखा जाणवला. शहरात सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत होते. दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता अधिक होती. सायंकाळी व उशिरा रात्रीपर्यंत उन्हाच्या झळा जाणवल्या. हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यामुळे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur temperature 45.4