नागपूरच्या व्यापाऱ्याची शेगावात फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

एका पार्टीला पाच लाखाच्या शंभर रुपये नोटांची चिल्लर पाहिजे तुझ्याकडे आहे का? त्याबदल्यात तुला पाचशे रुपयांच्या नोटा व दहा रुपये प्रमाणे कमिशन पण दिले जाईल असे विचारले असता व्यापारी अमित याने हो म्हटले. 

शेगाव (जि.बुलडाणा) : नागपूर येथील एका व्यापाऱ्याची शेगावमध्ये पाच लाख रुपयांनी फसवणूक झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध (ता.२३) गुन्हा दाखल केला आहे.

अमित सुरेश उल्हे (वय ३४) रा.गिट्टी खदान नागपूर यांचा शेंगदाणा व साबुदाणा ट्रेडिंग व्यवसाय असून, नागपूर जिल्ह्यातील दुकानदारांना ते चिल्लर विक्री करतात. त्यांना १८ डिसेंबर रोजी अमित आसन्ना पैडलवार रा.फ्रेंड्स कॉलनी नागपूर यांचा फोन आला व एका पार्टीला पाच लाखाच्या शंभर रुपये नोटांची चिल्लर पाहिजे तुझ्याकडे आहे का? त्याबदल्यात तुला पाचशे रुपयांच्या नोटा व दहा रुपये प्रमाणे कमिशन पण दिले जाईल असे विचारले असता व्यापारी अमित याने हो म्हटले. 

महत्त्वाची बातमी - हिऱ्याचा हार घेऊन चोर घुसले अकोल्यात

पैसे घेऊन शेगावला बोलाविले
मी २० डिसेंबरला शेगावला जातो असे त्याने सांगितले. त्यानंतर अमितला फोन करून त्याने २१ डिसेंबर रोजी संध्याकाळी शेगावला पैसे घेऊन बोलावले. अमित उलहे व त्याचा मित्र रवींद्र हरिश्चंद्र वाकपंजर पाच लाख रुपये घेऊन ठरल्याप्रमाणे शिवाजी चौकमध्ये त्याचे भेटीला आला. त्याठिकाणी अमित पैडलवार त्यांना भेटला त्याने फोन करून भगत, शिवा आणि प्रवीण नामक व्यक्तींना फोन करून बोलावून घेतले ते पांढऱ्या स्कूटरने तेथे आले. 

क्लिक करा - बिबट्या आला रे!

पैसे घेतले अन् फोन बंद
पोलिस असल्याने वाटिका चौकात चला असे म्हणून तिथे घेऊन गेले आणि त्याठिकाणी रस्त्याचे आतमध्ये एका गल्लीत नेऊन त्यांनी अमित जवळील काळ्या रंगाच्या बॅग मधील पाच लाख रुपये घेऊन पाचशेच्या नोटांची रक्कम न देता निघून गेले. नंतर त्यांचा फोन बंद केला. 

असे का घडले? - तु माझी पत्नी नाही, तुला विकत आणले आहे म्हणतं' तो करायचा तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य

आधी अकोला येथे या...नंतर अमरावती येथे या
त्यानंतर अकोला येथे या पैसे देतो असे ते बोलले अमित दुसऱ्या दिवशी २१ अकोला येथे गेल्यावर काटेपुर्णाला या असे म्हणून फोन बंद केला. त्यादिवशीचे अकोला येथे रात्री मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत फोन लागला असता त्यांनी अमरावतीला या असे सांगितले म्हणून अमित तेथे गेला मात्र नंतर त्यांचा फोन बंद होता. त्यामुळे या लोकांनी फसवणूक केली. अशी तक्रार शेगाव शहर पोलिस स्टेशनला दिल्याने पोलिसांनी याप्रकरणी अमित पैडलवार, भगत, शिवा व प्रवीण यांच्याविरुद्ध नुसार गुन्हा नोंदवला आहे. तपास ठाणेदार संतोष ताले यांचे मार्गदर्शनात नापोकॉ उमेश बोरसे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur trader's cheats in shegaon akola marathi news