चार सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. यापूर्वी महाविद्यालयांना 5 ऑगस्टपर्यंत प्रवेश करायचे होते. मुदतवाढीची अधिसूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे.

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. यापूर्वी महाविद्यालयांना 5 ऑगस्टपर्यंत प्रवेश करायचे होते. मुदतवाढीची अधिसूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे.
विद्यापीठातील साडेचारशेहून अधिक संलग्नित महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमासाठी जून महिन्यात प्रक्रिया सुरू झाली. यंदाही विद्यापीठाने पदवी प्रवेशाचे कॉमन वेळापत्रक आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली. यानुसार पदवी अभ्यासक्रमात महाविद्यालयांमध्ये अर्ज करून गुणवत्ता यादीनुसार प्रवेश द्यायचे होते. ते प्रवेश संपल्यावर बऱ्याच महाविद्यालयांनी बी.एस्सी आणि बी.कॉमच्या प्रथम वर्षासाठी वीस टक्के अतिरिक्त जागांची मागणी केली. त्यामुळे अद्यापही बऱ्याच महाविद्यालयांमध्ये वीस टक्के जागा आणि इतर महाविद्यालयात रिक्त असलेल्या जागांसाठी प्रवेश सुरू आहे. त्यातूनच ही मुदतवाढ देण्यात आल्याचे दिसून येते. आता महाविद्यालयांना 4 सप्टेंबरपर्यंत प्रवेश देता येईल. मात्र, त्यानंतर कुठल्याच प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही. त्यासाठी राज्यपालाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
बीएस्सी, बीकॉम फुल्ल
पदवी अभ्यासक्रमात गतवर्षीप्रमाणे यंदाही बी.कॉम आणि बीएस्सी अभ्यासक्रमातील जागा बहुतांश महाविद्यालयात फुल्ल झाल्या आहेत. त्यातूनच यंदा 92 महाविद्यालयांनी वाढीव जागांची मागणी केली. मात्र, कला शाखेत बऱ्याच जागा रिक्त असल्याचे चित्र आहे. तसेच पदवी अभ्यासक्रमाप्रमाणेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांनाही या मुदतवाढीचा फायदा मिळेल. विद्यापीठाने यंदा ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली. त्यातून बहुतांश प्रवेश देण्यात आले.
.........


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur university admission news