नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात वि. दा. सावरकरांचे आत्मचरित्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

तज्ज्ञांचा एक गट आणि तत्कालीन विरोधी पक्ष कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने संघाचे हे प्रकरण अभ्यासक्रमात सामील करण्यासंदर्भात तीव्र विरोध दर्शविला होता. या मुद्द्यावरून प्रदर्शनही झाले. परंतु, विद्यापीठ आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनचरित्र सामील करण्याची तयारी सुरू असून, या विषयावरून सध्या चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
बी. ए. प्रथम वर्षाच्या मराठी साहित्य या विषयात सावरकर यांचे आत्मचरित्र "माझी जन्मठेप'चा समावेश करण्यासाठी सोमवारी बोर्ड ऑफ स्टडीजच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला. मराठी बोर्डाच्या अध्यक्ष डॉ. रेखा वडिखाये यांनी हा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावावर अन्य सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला. यासंदर्भात तर्कवितर्क झाल्याने बैठकीत वाद निर्माण झाला. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय राखून ठेवण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बी. ए. च्या अभ्यासक्रमात सामील करणे जवळपास निश्‍चित झाले आहे.
काही सदस्यांचा तीव्र विरोध

क्लिक करा - जालियनवाला बागेतील दिवसपरत आले : उद्धव ठाकरे

विद्यापीठाचे भगवेकरण करण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने आरोप होत असतो. यापूर्वीही अभ्यासक्रमात "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान' हे प्रकरण सामील करण्यावरून वादविवाद झाले होते. तज्ज्ञांचा एक गट आणि तत्कालीन विरोधी पक्ष कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने संघाचे हे प्रकरण अभ्यासक्रमात सामील करण्यासंदर्भात तीव्र विरोध दर्शविला होता. या मुद्द्यावरून प्रदर्शनही झाले. परंतु, विद्यापीठ आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

आता पुन्हा विद्यापीठाकडून अभ्यासक्रमात सावरकरांचे आत्मचरीत्र सामील करण्याला भगवेकरणाशी जोडले जात आहे. राज्यात सद्यस्थितीत सावरकरांवरून चांगलेच राजकारण तापले आहे. सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही विधीमंडळात या मुद्द्यावर हंगामा झाला. त्याचवेळी विद्यापीठाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा रंगली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur University Course Right? Savarkar's autobiography