विद्यापीठात व्याख्यान वादाचे दुसरे पुष्प 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते खासदार सीताराम येचुरी यांच्या व्याख्यानासाठी परवानगीच दिली नसताना त्यांना विमानाचे तिकीट कोणी पाठविले, याकरिता खर्च कोणी व कुठून केला, असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात आयोजक डॉ. प्रदीप आगलावे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी चुप्पी साधली असल्याने विद्यापीठात व्याख्यान वादाचे दुसरे पुष्प सुरू झाले आहे. 

विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे 18 मार्चला दीक्षान्त सभागृहात "भारतीय लोकशाहीचा ऱ्हास : आव्हाने आणि उपाय' या विषयावर सीताराम येचुरी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. मात्र, प्रशासकीय परवानगीच घेतली नसल्याचे सांगून विद्यापीठाने दोन दिवस आधी कार्यक्रम रद्द केला. यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला. यानंतर त्यांचे व्याख्यान आंबेडकर महाविद्यालयात घेण्यात आले. विद्यापीठाने कार्यक्रम का रद्द केला, अशी विचारणा येचुरी यांना केली असता त्यांनी कुलगुरूंनाच विचारा, असे उत्तर दिले. परवानगी नव्हती तर विद्यापीठाने मला एक महिन्याअगोदर तिकीट का पाठविले, असाही सवाल त्यांनी केला. त्यामुळे तिकीट कुणाच्या परवानगीने पाठविण्यात आले होते, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

संबंधित कार्यक्रम हा केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानातून आयोजित करण्यात आला होता. मात्र, निधी विद्यापीठाच्या विकास विभागाच्या माध्यमातून संबंधित शैक्षणिक विभागात जातो. सर्व खर्चाचे ऑडिटसुद्धा केले जाते. त्यामुळे रक्कम परस्पर काढली काय किंवा कोणीतरी याचा खर्च उचलला, असेही प्रश्‍न समोर येऊ लागले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे हेच याची माहिती देऊ शकतात. 

मान्यताच नसल्याने तिकीट कसे काढणार? 
याबाबत कुलगुरूंना विचारणा केली असता, त्यांनी प्रशासकीय मान्यताच घेण्यात आली नसल्याने विमानाची तिकिटे काढण्याचा प्रश्‍नच येत नसल्याचे सांगितले. कुठल्याही पाहुण्याला बोलवायचे असल्यास रेल्वेचे तिकीट देण्यात येते. विमानाचे तिकीट पाठवायचे असेल, तर अगोदर लेखी परवानगी घ्यावी लागते, असे डॉ. काणे यांनी सांगितले.

Web Title: Nagpur University issue