अकरावी प्रवेश प्रक्रिया झाली भ्रष्ट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

नागपूर - खासगी महाविद्यालये व मोठ्या शिकवणीवर्गाचे मालक अकरावी प्रवेशप्रक्रियेची सूत्रे पडद्यामागून चालवीत असल्याने ही प्रक्रिया भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना द्विलक्षी प्रवेशासाठी कुठलाही पर्याय न देता छुप्या पद्धतीने प्रवेश घेण्यात येणार आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशप्रक्रियेला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचा आरोप पालकांकडून होत आहे.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर शनिवारी शिक्षण विभागाकडून धनवटे महाविद्यालयामध्ये पालक अणि विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. 

यावेळी प्रवेशप्रक्रियेमध्ये प्रचंड घोळ असल्याचे दिसून येताच पालकांनी चांगलाच गोंधळ घातला. २५ टक्के जागांवर द्विलक्षीचे प्रवेश हे ऑनलाइन पद्धतीने, तर ७५ टक्के जागा महाविद्यालय स्तरावर भरण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. द्विलक्षी प्रवेशाच्या संदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून कुठलेही स्पष्ट संकेत न दिल्याने हा घोळ निर्माण झाला आहे. अनेक पालकांनी शिक्षण विभागाच्या विरोधात न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शिक्षण विभागाचेही धाबे दणाणले आहेत. या प्रकारामध्ये महाविद्यालय आणि क्‍लासेसचे टायप हा छुपा अजेंडा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रवेशाची खात्री नाही
प्रवेशअर्ज करताना कला, वाणिज्य, सामान्य विज्ञान व द्विलक्षी शाखा अशाप्रकारे प्रवेशाचे पर्याय देणे आवश्‍यक आहे. मेडिकल व इंजिनिअरिंगला जाणारे अनेक विद्यार्थी हे द्विलक्षी अभ्यासक्रमाची निवड करतात. मात्र, ऑनलाइन अर्जामध्ये केवळ कला, वाणिज्य आणि सामान्य विज्ञान एवढेच पर्याय आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सामान्य विज्ञानाचा पर्याय निवडल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये द्विलक्षी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेलच याची कुठलीही निश्‍चिती नाही.

Web Title: nagpur vidarbha eleventh admission process corrupted