कराटेपटूला हवी आहे मदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

मलेशिया व सिंगापूर येथील स्पर्धेसाठी कुणालची निवड
नागपूर - उदयोन्मुख कराटेपटू कुणाल हाडकेची मलेशिया व सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धांसाठी निवड झाली. मात्र, हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांची विदेशवारी हुकण्याची शक्‍यता आहे. कुणालला समाजाकडून मदतीचा हात दिला गेल्यास त्याचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. 

सोमलवार खामला येथे शिकणाऱ्या कुणालची येत्या २५ ते २९ जुलैदरम्यान मलेशिया व सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत तो १६ वर्षांखालील मुलांच्या गटात सहभागी होईल. कुणाल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्याचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्‍यता आहे. कुणालचे वडील अरुण हे ऑटोचालक आहे. कुणालला या स्पर्धेसाठी एक लक्ष रुपये हवे असून, इतकी रक्‍कम खर्च करण्याची ऐपत त्याच्या वडिलाची नाही. बहुजन हिताय संघासह, विजया पाटील व अन्य दानशूर व्यक्‍तींनी कुणालला २५ हजारांची मदत केली असून, आणखी ७५ हजारांची गरज आहे. कुणालला मदत करू इच्छिणाऱ्यांनी खामला येथील पंजाब नॅशनल बॅंकेतील १४७२००१५०००७०१८० या खात्यात रक्‍कम जमा करावी. पीयूएनबी०१४७२०० हा आयएफएससी कोड आहे. 

प्रशिक्षक विशाल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या कुणालने गोवा, कोल्हापूर, मुंबईसह नागपुरात झालेल्या विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सात सुवर्णांसह जवळपास दहा-बारा पदके जिंकली आहेत.

Web Title: nagpur vidarbha karate player wants help