७०० मुलांच्या दुभंगलेल्या ओठांवर फुलले हास्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नागपूर - चार वर्षांपूर्वी स्माइल पिंकी या भारतीय माहितीपटाने ऑस्कर मिळवला होता. त्यानंतर दुभंगलेले ओठ असलेल्या मुलांच्या ओठावरील शस्त्रक्रियांचा ‘राष्ट्रीय बालआरोग्य योजने’त समावेश झाला. यामुळे दरवर्षी ओठ दुभंगलेल्या हजारो मुलांच्या चेहऱ्यावर हास्य खुलते. अशा बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी स्माईल ट्रेन संस्थेच्या स्तुत्य उपक्रमात नागपुरातील चाइल्ड हॉस्पिटल जुळले असून यावर्षी ७०० पेक्षा शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. 

दुभंगलेले ओठ असलेले व्यंग घेऊन दरवर्षी दोन हजार मुले महाराष्ट्रात जन्म घेतात. तर देशात ३५ हजार मुलांचा जन्म होतो. आज देशभरात पाच लाख मुले शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. साधारणपणे जन्मल्यानंतर तीन महिन्यांत ओठ दुभंगलेल्या मुलांची शस्त्रक्रिया करणे चांगले, तर टाळू दुभंगलेल्या मुलांची एक वर्षाच्या आत शस्त्रक्रिया करणे योग्य ठरते. वेळेत शस्त्रक्रिया झाली नाही तर मुलांच्या बोलण्यावर परिणाम होतो, असे पत्रकारांशी संवाद साधताना प्रसिद्ध दंतरोग चिकित्सक डॉ. अभय दातारकर म्हणाले. 

स्माईल ट्रेन इंडियातर्फे नागपूरसह परिसरातील लहान मुलांच्या सातशेवर दुभंगलेल्या ओठांवर मोफत शस्त्रक्रिया चाईल्ड हॉस्पिटलच्या सहकार्याने करण्यात आल्या. 

नुकतेच वर्ल्ड स्माईल डेचे निमित्त साधून स्माईल ट्रेन या उपक्रमाशी जुळलेल्या डॉक्‍टरांनी दुभंगलेल्या ओठांच्या उपचारांबाबत जनजागृती करून हा दिवस साजरा केला. क्‍लेफ्ट लिप्स सर्जरी, प्री आणि पोस्ट ऑपरेटिव्ह सेवा देण्यात येतात तसेच ऑर्थोडोंटिक्‍स आणि स्पीच थेरेपी उपलब्ध करून दिली. स्माईल ट्रेनतर्फे नियमित स्वरूपात सर्जन, नर्सेस, ऑर्थोडोंटिस्ट आणि स्पीच थेरपिस्टसाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रमदेखील राबवण्यात येतो.

दुभंगलेल्या ओठावर केवळ ४५ मिनिटांची शस्त्रक्रिया संपूर्ण आयुष्य बदलू शकते. यामुळे बोलणे, खाणे, श्वास घेणे या सर्व क्रिया सुलभ होतात. न्यूनगंड दूर होतो. आत्मविश्वास वाढतो. आर्थिक दुर्बल घटकातील अशा मुलांना याचा लाभ मिळावा, यासाठी स्माईल ट्रेन उपक्रमाचा प्रयत्न आहे. यामुळेच www.smiletrainindia.org वर संपर्क साधून लाभ घेता येईल.
- डॉ. अभय दातारकर, प्रा. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय.

Web Title: nagpur vidarbha news 700 children surgery on lips