आंदोलने, रास्ता रोको, उपोषणाचा ‘सुपर मंडे’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नागपूर - आंदोलने, निदर्शने, उपोषणामुळे सोमवार चांगलाच धावपळीचा ठरला. काँग्रेसने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या पुतळ्याचे दहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसने लोडशेडिंगच्या विरोधात तर भाजपने केरळमध्ये स्वयंसेवकांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जय जवान जय किसानतर्फे उपोषण करण्यात आले. मेट्रो रेल्वेच्या विरोधात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी एकत्रित रास्ता रोको आंदोलन केले. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने ठोस आश्‍वासन न दिल्‍याने संविधान चौकात भरपावसात एकत्र येऊन सेविकांनी एकजूट दाखविली.

नागपूर - आंदोलने, निदर्शने, उपोषणामुळे सोमवार चांगलाच धावपळीचा ठरला. काँग्रेसने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या पुतळ्याचे दहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसने लोडशेडिंगच्या विरोधात तर भाजपने केरळमध्ये स्वयंसेवकांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जय जवान जय किसानतर्फे उपोषण करण्यात आले. मेट्रो रेल्वेच्या विरोधात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी एकत्रित रास्ता रोको आंदोलन केले. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने ठोस आश्‍वासन न दिल्‍याने संविधान चौकात भरपावसात एकत्र येऊन सेविकांनी एकजूट दाखविली. यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. एरवी असे चित्र शहरात हिवाळी अधिवेशनात बघायला मिळते. 

शहर काँग्रेसने देवडिया भवन येथे महत्त्वाची बैठक बोलाविली होती. तत्पूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांचे पुत्र जय शहा यांच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याकडे लक्ष वेधण्यासाठी अमित शहा यांच्या पुतळ्याचे दहन केले. विषारी फवारणीच्या बळीमुळे सरकारच्या विरोधात वातावरण तापले असतानाच जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे सर्वांचे लक्ष वेधले. भाजपचे खासदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट टीका करून आणखी वातावरण तापविले. मेट्रो रेल्वेच्या लोखंडी रॉड कोसळल्याने एक युवती रविवारी जखमी झाली होती. याविरोधात भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलन करून काम बंद पाडले.

Web Title: nagpur vidarbha news agitation fasting super sunday