आयुर्वेद उपचाराकडे वाढला कल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात रुग्णसंख्येत झाली वाढ
नागपूर - सक्करदरा परिसरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील उपचाराचा दर्जा वाढविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या उपचार पद्धतीकडे नागपूरकरांचादेखील कल वाढत आहे. वर्ष सुरू झाल्यापासून अवघ्या सहा महिन्यांत बाळरोग विभागासह अन्य बाह्यरुग्ण विभागात उपचाराला येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले.

शासकीय आयुर्वेदमध्ये २०१५ या वर्षात १ लाख ६ हजार ५५६ रुग्णांनी बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतले. यापैकी ३० हजार रुग्ण बाळरोग विभागात उपचाराला आले. याच वर्षात ४३ हजार ९७८ रुग्णांनी कायचिकित्सा, तर २४ हजार ६१७ रुग्णांनी पंचकर्माचे उपचार घेतले. याशिवाय अपघातात किरकोळ दुखापती घेऊन तात्पुरत्या उपचारासाठी अपघात विभागात ५ हजार ७५१ रुग्णांनी उपचार घेतले.

२०१६ मध्ये याच रुग्णालयात १ लाख ७७ हजार ६३ रुग्ण उपचारासाठी आले. त्यात बाळरोग विभागातील रुग्णांचा आकडा ३२ हजारांपर्यंत गेला. कायचिकित्सा विभागात याच वर्षी ५८ हजार ७६३ रुग्णांनी उपचार घेतले.
चालू वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत आयुर्वेद रुग्णालयात जवळजवळ ४९ हजार रुग्ण आले. एकट्या बाळरोग विभागात उपचाराला आलेल्या रुग्णांची संख्या ९ हजारांवर गेली आहे. रुग्णांचा वाढता कल पाहता नागपूरमध्येही आयुर्वेद उपचार पद्धतीला प्राधान्य दिले जात असल्याचे स्पष्ट होते. माहिती अधिकार कार्यकर्ता अभय कोलारकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवरून ही वस्तुस्थिती समोर आली आहे.

नेत्ररोगावर आयुर्वेद
शासकीय वैद्यकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील नेत्ररोग विभागात २०१५ मध्ये ३२ हजार रुग्णांनी उपचार घेतला. २०१६ मध्ये ३८ हजारांवर रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात झाली. यावरून नेत्ररोगावरही आयुर्वेदातील उपचारावर भर दिला जात असल्याचे स्पष्ट होते.

Web Title: nagpur vidarbha news ayurved treatment craze increase