दारुड्या पोलिसाची गुंडगिरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

तरुण रक्तबंबाळ - जाब विचारणाऱ्या भाजप नेत्यांच्याच बदनामीचेही कृत्य

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातच दारुड्या वाहतूक पोलिसाने एका तरुणाच्या डोक्‍यात काठी हाणून रक्तबंबाळ केले.

घटनेनंतरही दोन तासापर्यंत तरुणाला रुग्णालयात दाखल न केल्याने संतप्त भाजप नेते दयाशंकर तिवारी यांनी गणेशपेठ पोलिस ठाण्यातील ड्यूटी ऑफिसर कांडेकर यांना जाब विचारला. मात्र, त्यांच्या चिडण्याची ‘व्हिडिओ क्‍लिप’ ‘व्हायरल’ करून त्यांच्याच बदनामीचे कृत्यही पोलिसांनी केले.

तरुण रक्तबंबाळ - जाब विचारणाऱ्या भाजप नेत्यांच्याच बदनामीचेही कृत्य

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातच दारुड्या वाहतूक पोलिसाने एका तरुणाच्या डोक्‍यात काठी हाणून रक्तबंबाळ केले.

घटनेनंतरही दोन तासापर्यंत तरुणाला रुग्णालयात दाखल न केल्याने संतप्त भाजप नेते दयाशंकर तिवारी यांनी गणेशपेठ पोलिस ठाण्यातील ड्यूटी ऑफिसर कांडेकर यांना जाब विचारला. मात्र, त्यांच्या चिडण्याची ‘व्हिडिओ क्‍लिप’ ‘व्हायरल’ करून त्यांच्याच बदनामीचे कृत्यही पोलिसांनी केले.

मद्यप्राशन करून तरुणाला मारहाण करणारे वाहतूक पोलिस किशोर जाधव यांना निलंबित करण्याची मागणी भाजप नेते दयाशंकर तिवारी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 

महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष व माजी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी  पोलिसांना शिवीगाळ केल्याची व्हिडिओ क्‍लिप आज अनेकांच्या मोबाईलवर व्हायरल झाली. मात्र, या प्रकरणा मागील वास्तव तिवारी यांनी सत्तापक्षनेते संदीप जोशी यांच्या कक्षात उलगडले अन्‌ वाहतूक पोलिसांची गुंडगिरीच उघड झाली. रविवारी उत्तर रात्रीपर्यंत रंगलेल्या या घटनेची माहिती देताना तिवारी यांनी घटनाक्रम सांगितला. बजेरिया येथील एलएलबी चौथ्या वर्षातील विद्यार्थी वैभव दीक्षित व बीई द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आदित्य ठाकूर दोघेही मेडिकल चौकातील मित्राकडे मोक्षधाम चौकाजवळून जात होते. 

याचवेळी तेथे वाहनांची तपासणी करणारे किशोर  रमेश जाधव या वाहतूक पोलिसाने वैभवच्या डोक्‍यावर काठीने प्रहार केला. यात वैभव रक्तबंबाळ झाला. त्याला बघून प्रकरण अंगावर येण्याची जाणीव होताच तेथेच असलेल्या दोन पोलिसांपैकी एकाने रुमाल काढून वैभवला दिला व घरी परत जाण्यास सांगितले. पोलिसांच्या भीतीने दोघेही घटनास्थळावरून निघाल्याचे तिवारी यांनी सांगितले. या दोघांनीही तिवारी यांना फोन केला. रात्री बाराच्या सुमारास तिवारी गणेशपेठ पोलिस स्टेशनला आले. त्यांनी येथे ड्यूटी ऑफिसर असलेले कांडेकर यांना जाब विचारला. मात्र, कांडेकर यांनी तिवारी  यांच्याशी उलट व्यवहार केला. दोन तासांपासून तरुण रक्तबंबाळ असताना पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले नसल्याने ते पोलिसांवर चिडले. या वादातच तोंडून अपशब्द निघाल्याची कबुली तिवारी यांनी दिली.

वाहतूक पोलिसाने केले मद्यप्राशन  
या सर्व घटनाक्रमादरम्यान पोलिसांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली. मात्र, कांडेकर यांनी वैद्यकीय तपासणी केल्यास तुमच्यावर पोलिसांशी अभद्र वागणुकीचा गुन्हा दाखल करू, तुमची व्हिडिओ क्‍लिप तयार केली असून, ती व्हायरल करू, अशी धमकी दिल्याचे तिवारी यांनी सांगितले. मात्र, वैद्यकीय तपासणीवर ठाम राहिल्याने किशोर जाधव याची तपासणी झाली. त्यात तो मद्यप्राशन करून ड्यूटीवर असल्याचे स्पष्ट झाल्याचे तिवारी म्हणाले. 

नेत्यांशीच मुजोरी तर सामान्य नागरिकांचे काय? 
सत्ताधारी भाजप नेत्यानेही जाब विचारल्यास पोलिस त्यांच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे सामान्य नागरिकांचे काय होणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस आयुक्तांकडे करणार असल्याचे तिवारी म्हणाले. याप्रकरणी दारुड्या पोलिसाविरुद्ध गणेशपेठ पोलिस ठाण्यात तरुणांनी तक्रार दाखल केली. पोलिसांना नेहमीच सहकार्याची भूमिका असल्याचेही तिवारी म्हणाले.

Web Title: nagpur vidarbha news beating by police