पोलिस उपनिरीक्षकास ‘फिल्मी स्टाइल’ने मारहाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

नागपूर - काही टारगट युवकांमध्ये वाद सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकास ‘फिल्मी स्टाइल’ने जबर मारहाण करण्यात आली. जीव वाचविण्याच्या भीतीने पळायला लागला. मात्र, आरोपींनी त्यांचा पाठलाग करून पुन्हा मारहाण केली. यात भावेश कावरे या पोलिस उपनिरिक्षकाचे हात फ्रॅक्‍चर झाल्याची माहिती आहे. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. 

शनिवारी दुपारी एकच्या सुमारास म्हाळगीनगर चौकात दोन गटात भांडण सुरू होते. दरम्यान, त्याच चौकात पोलिस उपनिरीक्षक भावेश कावरे हे नाश्‍ता करीत होते. त्यांनी मध्यस्थी करीत वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते डीबी पथकात असल्यामुळे खाकी वर्दीत नव्हते. त्यामुळे आरोपींना त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास बसला नाही. 

भांडण सोडवीत असताना चार ते पाच युवकांनी अचानक कावरे यांच्यावर हल्ला केला. त्या युवकांचा रौद्र अवतार पाहून कावरे हे जिवाच्या भीतीने पळायला लागले. मात्र, आरोपींनी त्यांचा फिल्मी स्टाइलने पाठलाग केला. त्यांना खाली पाडून लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार युवकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

Web Title: nagpur vidarbha news beating to police officer