हायवेवर उंच इमारत बांधा आणि बार सुरू करा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

नागपूर - सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ५०० मीटरच्या आत मद्यविक्रीस बंदी घातली आहे. मात्र, याची चिंता करायची गरज नाही. हायवेलगत ५०० मीटर उंच इमारत बांधून मद्य विक्री सुरू करता येते. ऐकायला आश्‍चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे. उत्पादन शुल्क विभागाने रामदासपेठेतील एका बड्या हॉटेलमध्ये सहाव्या माळ्यावर मद्य विक्रीस परवाना दिला आहे. विशेष म्हणजे हे हॉटेल राष्ट्रीय  महामार्गापासून ३०० मीटरच्या आत आहे. 

मद्य पिऊन वाहन चालविल्याने अपघात होतात. त्यामुळे राष्ट्रीय व राज्य महामार्गावर ५०० मीटरच्या आत मद्य विक्रीस बंदी घालण्याचा आदेश डिसेंबर २०१६ ला सर्वोच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून १ एप्रिलपासून दोन्ही महामार्गापासून ५०० मीटरच्या आत मद्यविक्रीस बंदी घालण्यात आली. मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील ६०० च्या जवळपास मद्यविक्रीची दुकाने बंद झाली. दारूविक्रीस परवानगी द्यावी म्हणून काहींनी नागपूर उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली. यामुळे महामार्गालगतचे हॉटेल्स व्यावसायिकांच्या व्यवसायावरही परिणाम झाला. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामदासपेठ येथील एका हॉटेलला मद्यविक्रीस उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना देण्यात आला आहे. हे हॉटेल नागपूर-वर्धा राष्ट्रीय मार्गापासून ३०० मीटरच्याही आत आहे. माहितीनुसार, या हॉटेलच्या प्रथम माळ्यावर मद्यविक्रीस मंजुरी होती. आता सहाव्या माळ्यावर मद्यविक्री केंद्रास मंजुरी देण्यात आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गापासून ५०० मीटरच्या आत मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. विदेशी दारू नियम १९५३ नुसार चालण्याचे अंतर लक्षात घेता, मंजुरी देण्यात येते. एअर डिस्टन्स (हवाई अंतर) लक्षात घेतले जात नाही. या नियमाचा आधार घेतच सेंटर पाॅइंट हॉटेलला सहाव्या माळ्यावर मद्यविक्रीची परवानगी देण्यात आली आहे. पूर्वी प्रथम माळ्यावर मद्यविक्रीस मंजुरी होती.
- स्वाती काकडे, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग

प्रवेशद्वार दाखविले मागच्या बाजूने
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित हॉटेलने प्रवेशद्वार मागच्या बाजूने दाखविले आहे. जेव्हा की प्रवेशद्वार समोर जनता चौक ते काच्छिपुरा चौकाच्या मार्गावर आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर प्रश्‍न उपस्थित होत आहे. दुसरीकडे वर्धा रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलनेही प्रवेशद्वार बदलवून मद्यविक्री सुरू केली आहे. प्रशासनाकडून मात्र नियमानुसार मंजुरी देण्याचा दावा करण्यात येत आहे.

Web Title: nagpur vidarbha news Build a highway and start the bar!