दप्तराचे ओझे तपासणीसाठी आजपासून विशेष मोहीम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

नागपूर - विद्यार्थ्यांच्या पाठीवर आणि डोक्‍यावर वाढणाऱ्या दप्तराच्या ओझ्याचा प्रश्‍न नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. यावर शासनाने उपाय म्हणून नव्या अभ्यासक्रमात पुस्तकांची संख्या कमी करीत विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला. शाळांच्या आठमुठ्या धोरणामुळे तो प्रयत्न फसला. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी झाले किंवा नाही हे तपासण्यासाठी विभागीय उपसंचालकांनी उद्या शुक्रवारपासून शाळांच्या तपासणीची विशेष मोहीम राबविण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुखांना दिलेत. 

नव्या अभ्यासक्रमात पुस्तकांची संख्या कमी करून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बहुतेक शाळांमध्ये पालकांना नियमित दोन किंवा तीन पुस्तकांच्या जोडीला १० ते १२ पुस्तकांची यादी हातात ठेवली जाते. या पुस्तकांसोबतच वेगवेगळ्या विषयांसाठी आणि उपक्रमांसाठी वह्या दिल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे दप्तर म्हणजे किमान सात ते आठ पुस्तके आणि त्याच्या जोडीला वह्या असे पाच ते आठ किलोचे वजन होते. याशिवाय विविध विषयांचे व्यवसाय, उपक्रम पुस्तिका मुलांवर लादल्या जातात. दप्तराचे ओझे कमी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. असे असूनही शाळांकडून त्याचे उल्लंघन केले जाते. शाळांमधील विद्यार्थ्यांचे ओझे तपासण्यासाठी उद्यापासून दोन दिवस विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आढळून आल्यास त्या शाळांवर कारवाई होणार आहे.

Web Title: nagpur vidarbha news cheaking campaign for book weight