नागाच्या विषावर तस्करांचा ‘दंश’

अनिल कांबळे
गुरुवार, 27 जुलै 2017

मध्य प्रदेशातील सिवनीत आंतरराष्ट्रीय तस्करी केंद्र  

नागपूर  - कोट्यवधींमध्ये किंमत असलेल्या सापाच्या विषाच्या तस्करीचे केंद्र मध्य प्रदेशातील सिवनी शहर आहे. येथे आंतरराष्ट्रीय तस्करांचा अड्डा आहे. महाराष्ट्रातून नागपूर आणि मुंबईतील सापतस्कर त्यांना मदत करतात. अनेक वेळा वनविभाग किंवा पोलिसांच्या सतर्कतेमुळे विष तस्करांवर कारवाई करण्यात येते. वर्षभरात पाच टोळ्यांवर कारवाई करून विष जप्त केले.

शहरात पोलिस आणि वनविभागाचे गुप्तहेर सापाच्या विष तस्करांवर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे सहा महिन्यांपासून कोणत्याही प्रकारची हालचाल विष तस्कर करीत नसल्याचे समोर आले आहे. मात्र, काही तथाकथित सर्पमित्रांच्या मदतीने मध्यप्रदेशातील विष तस्करांची टोळी कोट्यवधींच्या किमतीत विषाची तस्करी विदेशात करीत असल्याची माहिती आहे. सापाच्या विषाचा उपयोग मेडिसीन बनविण्यासाठी करण्यात येतो. तसेच नशायुक्‍त पदार्थ बनविण्यासाठीसुद्धा वापर होतो. सापाच्या विषापासून के-९ नावाचा अमली पदार्थ बनविला जातो. ते पेय क्‍लब आणि पबमधून युवक-युवतींना नशा आणण्यासाठी देण्यात येते. याची किंमत हजारोंमध्ये असते. सापाच्या विषातील एका थेंबातून के-९ या पेयाचे जवळपास ९० पेग बनविण्यात येतात. याची झिंग हायप्रोफाईल दारूपेक्षाही जास्त असल्याची माहिती आहे. पावडर आणि द्रव स्वरूपात के-९ अमली पदार्थ विकला जातो. अनेक पब मालक या पदार्थाचे ग्राहक आहेत. 

लाखोंचे विष जप्त
एमआयडीसी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी एमआयडीसीतून सापाच्या विषाची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक केली. दोन आरोपींना बेड्या ठोकून दीड कोटी रुपये किमतीचे सापाचे विष जप्त केले. त्यानंतर कोराडी पोलिसांनी तथाकथित सर्पमित्रासह चौघांना अटक करून लाखोंचे विष जप्त केले.

सापाला जीवदान द्या
अंधश्रद्धेतून सापाची पूजा केली जाते. साप दूध पितो, सापाचा नागमणी असतो अशा अनेक अंधश्रद्धा आहेत. साप दिसल्याबरोबर अनेकांच्या अंगावर काटा येतो. अंधश्रद्धेतून बिनविषारी सापालाही लोक मारून टाकतात. सापाचा काही नवशिके सर्पमित्र ‘खेळ’ करतात. त्यामुळे वनविभागाने नेमून दिलेल्या सर्पमित्रांनाच फोन करून साप निघाल्याची माहिती दिल्यास सापाला जीवदान देता येईल, असे सर्पमित्र स्वप्निल दुधाने यांनी सांगितले.

Web Title: nagpur vidarbha news cobra snake poison smuggling