वांजऱ्यात उद्योगांची वीजचोरी उघड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

मेगा ड्राइव्ह - २० जणांना कारवाईचा ‘शॉक’

नागपूर - एसएनडीएलच्या पथकाने सोमवारी वांजरा परिसरातील औद्योगिक क्षेत्र व निवासी वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. यात कारखान्यांमध्येही वीजचोरी होत असल्याचे उघडकीस आले. ७३ ठिकाणी करण्यात आलेल्या तपासणीत वीजचोरीची २० प्रकरणे उघडकीस आली. या ग्राहकांकडून एकूण १५ लाखांची वीजचोरी करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.

एसएनडीएलने कारवाईचे वीजचोरांविरुद्ध कारवाईचे पाश आवळले आहे. याअंतर्गत मोमिनपुरा परिसरात मोठ्या प्रमाणावर कारवाईची धडक मोहीम राबवून वीजचोरीच्या अनेक घटना उघडकीस आणण्यात आल्या. याच मोहिमेअंतर्गत एसएनडीएलचे पथक सोमवारी वांजरा परिसरात धडकले. भरपावसातही कामठी मार्गावरील औद्योगिक क्षेत्र, यशोधरानगर, शिवनगर, लोटस ले-आउट, संजीवनी क्वॉर्टर्स आदी भागांत विविध पथक एकाचवेळी धडकले. एकूण ७३ ठिकाणी मीटरची तपासणी करण्यात आली. यात २० मीटरबायपास करून वीजचोरी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. वांजरा परिसरात एकूण ५ ट्रान्सफार्मर असून त्यावरून सुमारे १ हजार २०० ग्राहकांना  वीजजोडणी देण्यात आली आहे. त्यातील अनेक ग्राहक औद्योगिक श्रेणीतील आहेत. गेल्या  अनेक महिन्यांपासून पाचही ट्रान्सफार्मरवरून दरमहा ५४ ते ५८ टक्के म्हणजेच सुमारे ३.१३ लाख युनिट वीजगळती होत असल्याची नोंद करण्यात येत होती. वीजचोरीमुळे एसएनडीएलचे दरमहा सुमारे २० लाखांचे नुकसान व्हायचे. पथकांनी केलेल्या तपासणीत रिमोट किट, न्यूट्रल कट, पोटेंशियल लिंक कट, आकोडे टाकून अशा वेगवेगळ्या पद्धतीने विजेची चोरी होत असल्याचे दिसून आले. 
स्थानिकांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोख पोलिस बंदोबस्त असल्याने विरोध अल्पकाळातच मावळला. एसएनडीएलचे व्यवसायप्रमुख सोनल खुराणा स्वत: कारवाईवर लक्ष ठेवून होते.

Web Title: nagpur vidarbha news crime on electricity thief

टॅग्स