वाठोड्यावर ‘साई’ची अवकृपा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

नागपूर - स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या केंद्रासाठी (साई) वाठोडा येथील जागा रिक्त करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. बुधवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाने अनेक पक्की घरे पाडण्यास सुरुवात केल्याने प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली होती. संतप्त नागरिकांनी मनपाच्या पथकावर हल्लाही करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी अकरा जणांना ताब्यातसुद्धा घेतले. 

साई केंद्राला वाठोड्यात १४० एकर जागा दिली आहे. यामुळे येथील ४२ घरे रिकामी  करण्यासाठी नेहरूनगर झोनने नोटीस बजावली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करून बांधकाम केले जात होते. बुधवारी दुपारी बारा वाजता ही घरे पाडण्याची कारवाई करण्यात आली. तब्बल चार  तास कारवाई चालली.

कारवाईदरम्यान या घरमालकांनी विरोध दर्शविला. पथकाचे वाहन अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पथक व नागरिकांमध्ये वादावादी झाली. अडथळे व आरडाओरड कारवाई रोखण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या मदतीने महापालिकेने कारवाईपूर्ण केली. मोकळी करण्यात आलेली जागा ‘साई’च्या ताब्यात देण्यात आली. अतिक्रमण विभागाचे साहाय्यक आयुक्त अशोक पाटील, प्रवर्तन अधीक्षक यादव जांभूळकर, प्रवर्तन  निरीक्षक संजय कांबळे, पथकप्रमुख मंजूर शाह, नितीन मंथनवार, प्रकाश पाटील, मोहरीर संजय शिंगणे, जमशेद अली यांच्यासह नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक पोलिस आयुक्त कापगते, नंदनवनचे पोलिस निरीक्षक एम. डी.  नलावडे व पथक सहभागी झाले होते.

‘दुबई’ बाजार हटविला
मनपाच्या अतिक्रमण पथकाने विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील दुबई बाजारही हटविला. परिसरातील चहाटपऱ्या व इतर दुकानांचे अवैध बांधकाम तोडण्यात आले. किरकोळ दुकानदारही हटविले. काही झेरॉक्‍स सेंटर व झुणका भाकरीचे स्टॉलही हटविण्यात आले. भाजीबाजारही उठविण्यात आला. अधिवेशन असल्याने या परिसरात गर्दी वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

Web Title: nagpur vidarbha news crime on encroachment by municipal