अवैध विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात अवैधपणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्यासाठी गुरुवारपर्यंतची मुदत देण्यात आली. वसतिगृहात याबाबत नोटीसदेखील लावली असून, अवैध विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षारक्षकांद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. 

नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. बाहेरील विद्यार्थी येथे राहत असून, प्रवेशित विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो. यासंदर्भात पावले उचलत विद्यापीठाने येथे प्रवेशित विद्यार्थ्यांची यादीच संकेतस्थळावर जाहीर केली होती. कोणत्या अभ्यासक्रमाचा कुठला विद्यार्थी कुठल्या खोलीमध्ये राहतो, इतकी ही सविस्तर माहिती होती. त्यापुढे जाऊन आता अशा प्रकारांना चाप लागावा, यासाठी प्रवेशप्रक्रियेची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करण्यात आली. वसतिगृहांची सुधारणा करण्यासाठी विद्यापीठाने मागील शैक्षणिक सत्रात विशेष समिती नेमली होती. या समितीने ज्यावेळी विधी विद्यापीठ परिसरातील वसतिगृहाची पाहणी केली तेव्हा प्रवेशित नसलेले अनेक विद्यार्थी तसेच अभ्यागत तेथे राहत असल्याचे आढळून आले होते. यंदादेखील वसतिगृहातील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून, एकही खोली रिकामी नसल्याने अनेकांना प्रवेशापासून मुकावे लागले. 

एका खोलीत दोन विद्यार्थ्यांना राहण्याची परवानगी असतानादेखील काही ठिकाणी चार ते पाच विद्यार्थी राहतात. अवैध पद्धतीने राहणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे नियमित विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. यामुळे ही कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: nagpur vidarbha news invalid student crime