मेयोत ५०० खाटांची ‘मेडिसीन विंग’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

नागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) आधुनिकीकरणाचे भिजतघोंगडे गेल्या दोन दशकांपासून कायम आहे. परंतु, अलीकडे अपघात विभागासह अडीचशे खाटांच्या ‘सर्जिकल कॉम्प्लेक्‍स’मुळे मेयो रुग्णालय कात टाकत असल्याचे दिसून येते. सर्जिकल कॉम्प्लेक्‍समध्ये अद्ययावत शल्यक्रियाग्रहांसह वॉर्ड सुरू झाले. तर आगामी काळात दुसऱ्या टप्प्यात मुख्य प्रशासकीय इमारतीसह ५०० खाटांची ‘मेडिसीन विंग’ उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, अद्याप याला प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. 

मेयो रुग्णालय सध्या ७५० खाटा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या तर १८३ खाटा रुग्णांसाठी अशी विभागणी केली आहे. सर्जिकल कॉम्प्लेक्‍समध्ये पहिल्या माळ्यावर अस्थिरोग विभागाचे तीन वॉर्ड, दुसऱ्या माळ्यावर नेत्र विभागाचा एक आणि तिसऱ्या माळ्यावर शल्यक्रिया विभागाचे दोन वॉर्ड कार्यान्वित झाले आहेत. चौथा माळा जळीत रुग्णांसाठी ठेवला आहे. नुकतेच नव्याने तयार करण्यात आलेल्या ५०० खाटांच्या क्षमतेची ‘मेडिसीन विंग’ स्वतंत्रपणे रुग्णसेवेसाठी असावी, यासंदर्भातील प्रस्ताव अधिवेशनादरम्यान सादर केला जाईल. पहिल्या टप्प्यातील ‘सर्जिकल विंग’साठी ७७ कोटी रुपये खर्च आला. तर, मेडिसीन विंगचा १०० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे. 
 
कधी लागतील ‘एमआरआय’?   
मेयोतील जीर्ण इमारती तोडण्याची परवानगी येताच त्या तोडण्यात येतील. तूर्तास वरिष्ठ निवासी डॉक्‍टरांची कमतरता आहे. ट्यूटरची संख्या कमी आहे. नवीन सिटी स्कॅनची गरज आहे. क्‍लिनिकल इन्व्हेस्टिगेशन यंत्रणेसह मेयो प्रशासनाला अद्याप ‘एमआरआय’ खरेदीचा मुहूर्त सापडला नाही. मेयोसाठी एमआरआय दिवास्वप्न ठरेल आहे. 

मेयोत प्रथमच नव्याने बांधकाम झाले. बहुउद्देशीय इमारत आणि मुलींच्या वसतिगृहाचा विषय  मार्गी लागला. शरीररचनाशास्त्र विभाग, सभागृह, परीक्षा हॉल, मुलींचे वसतिगृह, संग्रहालय, वाचनालय या सर्व त्रुटी दूर झाल्या आहेत. एमसीआयच्या निकषातील १५० जागांसाठी आवश्‍यक त्रुटी पूर्ण झालेल्या नाहीत.

- डॉ. मुकेश मेहता, प्रभारी अधिष्ठाता, मेडिकल

Web Title: nagpur vidarbha news meyo hospital 500 bed medicine wing