मिहानच्या प्रगतीवर समिती समाधानी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

नागपूर - मिहान प्रकल्पाला महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य व आमदार डॉ. सुनील देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी, हनुमंत डोळस, प्रा. डॉ. अशोक उइके, ॲड. आकाश फुंडकर, आमदार यशोमती ठाकूर, बळीराम सिरसकर यांनी भेट दिली. 

प्रारंभी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले. मिहान प्रकल्पाची माहिती दिली. दरम्यान, मिहानमधील उड्डाणपूल, रस्त्यांची कामे, विद्युत पुरवठा व पथदिवे, दूरसंचार व्यवस्था, जलशुद्धीकरण केंद्र, मलनिस्सारण, अग्निशमन केंद्र, मध्यवर्ती सुविधा इमारत व भूसंपादन आणि पुनर्वसनाचा आढावा घेतला. 

त्यानंतर मिहान प्रकल्पातील उद्योगांना भेट दिली. त्यात टाटा एअरोनॉटिक्‍स लिमिटेड, एअर इंडिया (एमआरओ), फ्युचर सप्लाय चेनचे वेअर हाउसचा समावेश होता. येथील उद्योगांचा आढावा घेतल्यानंतर उद्योगांना पूरक उद्योग विदर्भातील इतर भागांत उभारावेत, असे मत व्यक्त केले.  सल्लागार सुभाष चहांदे, मुख्य अभियंता समरेश चॅटर्जी, अधीक्षक अभियंता रजनी लोणारे, अशोक चौधरी, वास्तू विशारद चंद्रशेखर बनकर, पणन व्यवस्थापक समीर गोखले, के. आर. इंगोले, व्ही. एस. मुळेकर, मिहान इंडिया लिमिटेडचे महाव्यवस्थापक आबिद रुही, दीपक जोशी, प्रशांत सावरकर उपस्थित होते.

Web Title: nagpur vidarbha news mihan development committee