अल्‍पवयीन आरोपीला आज शिक्षा सुनावणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

नागपूर - बहुचर्चित युग चांडक अपहरण-हत्याकांडातील अल्पवयीन आरोपीविरुद्ध कट रचणे आणि खंडणीसाठी अपहरण करण्याचा आरोप गुरुवारी सिद्ध झाला. याप्रकरणी बाल न्यायालयाच्या न्यायाधीश एन. एन. बेदरकर यांच्यासमक्ष झालेल्या सुनावणीदरम्यान संबंधित अल्पवयीन आरोपीला दोषी धरण्यात आले. यामुळे बाल न्याय कायद्यातील तरतुदीनुसार अल्पवयीन आरोपीच्या वर्तनात सुधार व्हावा या दृष्टीने योग्य ती शिक्षा शुक्रवारी (ता. २१) सुनावण्यात येईल.   

लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथे १ सप्टेंबर २०१४ रोजी घडलेल्या या अपहरण-हत्याकांडातील दोन मुख्य आरोपी राजेश धनलाल दवारे आणि अरविंद अभिलाष सिंग यांना जिल्हा तसेच उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी आणि राजेशच्या लहान भावाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर तो जामिनावर होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर अंतिम सुनावणी सुरू आहे. गुरुवारी त्याला अपहरण आणि खंडणी मागण्याच्या कटामध्ये दोषी धरण्यात आले. त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप यावेळी सिद्ध झाले. सुनावणीदरम्यान अल्पवयीन आरोपी, त्याची आई तसेच चांडक कुटुंबीय उपस्थित होते. याप्रकरणी सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता एस. जी. शहारे यांनी तर आरोपीतर्फे ॲड. कराडे यांनी बाजू मांडली. 

घटनाक्रम

१ सप्टेंबर २०१४ सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास आठ वर्षांच्या युगचे अपहरण 
१ सप्टेंबर रात्री ८.१७ वाजता डॉ. मुकेश चांडक यांना पहिला फोन
१ सप्टेंबर रात्री ८.३८ वाजता दुसरा फोन
२ सप्टेंबर  रात्री ११ वाजताच्या सुमारास आरोपींच्या कबुलीवरून युगचा मृतदेह गवसला 
३ सप्टेंबर मेयो इस्पितळात शवविच्छेदन
१९ जानेवारी २०१५ आरोपींविरुद्ध सुनावणीस प्रारंभ
५ फेब्रुवारी २०१६ सत्र न्यायालयात फाशीची शिक्षा
५ मे २०१६ हायकोर्टात फाशी कायम
२० जुलै २०१७ अल्पवयीन आरोपी दोषी सिद्ध
२१ जुलै २०१७ आरोपीविरुद्ध शिक्षेची सुनावणी  

Web Title: nagpur vidarbha news Minor accused punishment today