वाहनांवर मोटार वाहन कराचा अतिरिक्त भार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

गाड्यांच्या श्रेणीनुसार कराची आकारणी
नागपूर - जीएसटीमुळे वाहने स्वस्त होतील, या आशेने अनेकांनी वाहन खरेदीचा बेत लांबणीवर टाकला होता. परंतु, मोटार वाहन करात भरीव वाढ करण्यात आल्याने किमती आणखीच वाढल्या असून, वाहन खरेदीसाठी ग्राहकांना अतिरिक्त खिसा रिकामा करावा लागणार आहे. गाड्यांच्या श्रेणीनुसार ग्राहकांवर ५ ते १५ टक्‍क्‍यांपर्यंतचा भुर्दंड बसणार आहे.

राज्य शासनाने नुकतेच परिपत्रक जाहीर करून दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी खासगी वाहनांवरील मोटार वाहन करात वाढ केली आहे. १४ जुलैपासून वाढीव दराने कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. आता दुचाकी वाहनांवर इंजिनाच्या क्षमतेनुसार ८०० ते १ हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहेत. ९९ सीसीचे इंजिन असलेल्या दुचाकी किंवा तीनचाकी वाहनांवर १० टक्के, ९९.१ ते २९९ सीसी इंजिनच्या वाहनांसाठी ११ टक्के, २९९ सीसीपेक्षा अधिक क्षमतेचे इंजिन असलेल्या वाहनांवर १२ टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी करण्यात येत आहे. तर, चारचाकी वाहनांवर किमीनुसार १५ ते २० हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. किंमत सारखी असली तरी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी, सीएनजी प्रकारानुसारही कराच्या किमती वेगवेगळ्या आहेत. नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांकडून वाढीव दरानुसार मोटार वाहन कराची आकारणी सुरू करण्यात आल्याचे शोरूममधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: nagpur vidarbha news Motor car tax extra burden on vehicles