पत्नीचा गळा आवळून खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

नागपूर - क्षुल्लक वादातून दारुड्या पतीने पत्नीला मारहाण करीत तिचा गळा आवळून खून केला. हे हत्याकांड आज मंगळवारी सकाळी नऊ वाजता यशोधरानगरातील कुंदनलाल गुप्ता नगरात उघडकीस आले. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला. रुक्‍मिणी राजू बोकडे (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. 

नागपूर - क्षुल्लक वादातून दारुड्या पतीने पत्नीला मारहाण करीत तिचा गळा आवळून खून केला. हे हत्याकांड आज मंगळवारी सकाळी नऊ वाजता यशोधरानगरातील कुंदनलाल गुप्ता नगरात उघडकीस आले. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला. रुक्‍मिणी राजू बोकडे (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू केशवराव बोकडे (५५) हा खासगी कंपनीत काम करतो. तो गेल्या एका वर्षांपासून तो कुंदनलाल गुप्ता नगरातील कौसल्याबाई कुंभारे यांच्या घरी भाड्याने राहतो. त्याची पत्नी रुक्‍मिणी  भाजीपाला विक्रीचे काम करीत होती. त्यांना एक मुलगा असून तो आजीकडे राहतो. राजू हा दारूच्या आहारी गेला असून तो नेहमी दारू पिऊन रुक्‍मिणीला मारहाण करीत असे. याच कारणावरून घरात पती-पत्नीचा वाद होत होता. यापूर्वीही राजूने पत्नी रुक्‍मिणी हिला खूप मारले होते. त्यामुळे ती आजारी राहत होती. तिचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे ती चार घरची धुणीभांडी करीत होती. 

सोमवारी रुक्‍मिणी आजारी असल्यामुळे घरात झोपली होती. सकाळीच राजूने तिला मारहाण केली आणि कामावर निघून गेला. रात्री आठ वाजता दारू पिऊन आल्यानंतर त्याने पुन्हा रुक्‍मिणीला मारझोड केली. दरम्यान, घरमालकीण कौसल्याबाई यांनी मध्यस्थी करीत प्रकरण मिटवले. 

मध्यरात्रीच्या सुमारास राजूने तिला लोखंडी रॉडने पुन्हा मारहाण करीत तिचा दुपट्याने गळा आवळून खून केला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी घटनास्थळाची पाहणी करून खुनाचा गुन्हा दाखल केला.

असे आले उघडकीस हत्याकांड
घरमालकीण कौसल्याबाईला आज सकाळी राजू दरवाजात बसलेला दिसला तर रुक्‍मिणीची हालचाल आली नाही. त्यांनी विचारपूस केली असता झोपली असल्याचे सांगितले. त्याने कौसल्याबाईला गंजात साखर आणि चहापत्ती देऊन चहा करून मागितला. चहा पिल्यानंतर तो घरातून पळून गेला. नऊ वाजले तरी रुक्‍मिणी घराबाहेर पडली नाही. त्यामुळे घरमालकिणीने घरात डोकावून पाहिले असता हत्याकांड उघडकीस आले.

रुक्‍मिणी तिसरी बायको 
आरोपी राजू याची कमाई चांगली होती. मात्र, तो आंबटशौकीन होता. त्यामुळे त्याची पहिली पत्नी कंटाळून सोडून गेली. त्यानंतरही त्याचे संबंध संपत नव्हते. त्याने एका विवाहित महिलेशी प्रेमविवाह केला. दोघेही राहत असताना पुन्हा अनैतिक संबंध उघडकीस आल्यामुळे दुसऱ्या पत्नीनेही त्याला सोडून दिले. भाजीविक्रेत्या रुक्‍मिणी यांच्यासोबत गेल्या एका वर्षापासून तो राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: nagpur vidarbha news murder in nagpur