लाचखोरीत पोलिस विभाग टॉपरच

लाचखोरीत पोलिस विभाग टॉपरच

नागपूर - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वर्षाअखेरीस प्रकाशित केलेल्या अहवालनुसार नागपूर परीक्षेत्रात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंतच्या आकडेवारीनुसार लाचखोरीमध्ये पोलिस विभाग ‘टॉप’वर आहे.

द्वितीयस्थानी महसूल, तर ‘टॉप थ्री’मध्ये पहिल्यांदाच वनविभागाचा समावेश झाला आहे. वर्षभरात पोलिस विभागावर २२ ट्रॅप झाले असून, ३२ लाचखोर पोलिसांना एसीबीने अटक केली. त्यामध्ये चार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वर्षभरात ११० सापळे कारवाई झाली असून, यामध्ये १४१ लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक केली. 

भ्रष्टाचाराची कीड पोखरून खात असल्यामुळे शिस्तप्रिय पोलिस प्रशासन खिळखिळे झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून पोलिस विभागात भ्रष्टाचार बोकाळला असून, त्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांचे कमी वेतन जबाबदार असल्याचे बोलले जाते. मात्र, गलेलठ्ठ वेतन असलेले वरिष्ठ पोलिस अधिकारीसुद्धा एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकल्याने तो दावासुद्धा खोटा ठरत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी नागपुरातील वाहतूक चेम्बरची बोली लागत असून, एका चेम्बरची किंमत १२ लाख रूपये असल्याची चर्चा शहरात होती. तसेच काही ‘क्रिम’ पोलिस ठाण्याच्या ठाणेदारपदासाठीही लाखोंमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा होती. 

यासोबतच वाहतूक पोलिसांचे ‘स्पेशल ड्राइव्ह’मध्येही पोलिस कर्मचारी ‘आर्थिक सबळता’ आणतात. त्यामध्ये अनेकांची वेगवेगळी भूमिका असते. अशा प्रकारामुळे पोलिस विभाग बदनाम होत आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सामान्य नागरिकांना संशय येत आहे. राज्याची आकडेवारी बघितल्यास वर्षभरात १६९ सापळे पोलिस विभागांत रचल्या गेले. यामध्ये १४ क्‍लास वन तर १२ ‘क्‍लास टू’ पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक केली. १७५ पोलिस हवालदार-शिपायांना लाचखोरीप्रकरणी अटक केली. लाच घेण्यासाठी पोलिसांना मदत करणाऱ्या १९ पोलिस मित्रांवरही एसीबीने गुन्हे दाखल केले. दुसऱ्या स्थानावर असलेल्या महसूल विभागात १४ सापळे झाले असून, त्यामध्ये १९ लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक केली. वनविभागावर १० सापळे रचले असून, त्यामध्ये १२ लाचखोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

राज्यातील कारवाई
 शहर    सापळे

 नागपूर        ११०
 अमरावती      ९१
 मुंबई         ४७
 ठाणे          ११८
 पुणे          १९०
 नाशिक       १२६
 औरंगाबाद      १३२
 नांदेड            ९९ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com