मेयोत गरिबांना मिळणार सुपरस्पेशालिटी सेवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

नागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) प्रशासन आणि येथून पास झालेले माजी विद्यार्थी यांच्यात सामंजस्य करारातून येथील उपचाराचा दर्जा  वाढविण्याचे प्रयत्न होणार आहेत. या करारामुळे तज्ज्ञ डॉक्‍टरांची आठवड्यात काही दिवस निःशुल्क सेवा मिळेल. या तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मदतीने पहिल्या टप्प्यात ७ विभागांत सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सेवा सुरू करण्यात येतील. विशेष असे की, विदेशात सेवा देणारेही विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती मेयोच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी दिली.

मेयोला २०१७ मध्ये पन्नास वर्षे पूर्ण होत आहे. हे निमित्त साधून हा पथदर्शी प्रयोग राबविण्याचा राज्यभरातील हा पहिलाच प्रयत्न आहे. मेयोत शिक्षण घेतलेले शेकडो विद्यार्थी देश-विदेशातील प्रतिष्ठित संस्थेत कार्यरत आहेत. ते सर्व मातृसंस्थेचे ऋण फेडून आपले कर्तव्य पार पाडणार आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने या प्रस्तावाला हिरवी झेंडी दिली असून संबंधित डॉक्‍टर आणि मेयो प्रशासन यांच्यात करार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पत्रकार परिषदेला  डॉ. सुधीर लांजेवार, डॉ. प्रशांत निखाडे, डॉ. आनंद पानगरकर, डॉ. रवी चव्हाण उपस्थित होते. 

मेयोतील प्रस्तावित प्रकल्प
सीएसआय निधीतून इंटिग्रेटेड चाईल्ड हेल्थ इन्स्टिट्यूट
सहा माळ्यांची प्रशासकीय इमारत (९२ कोटी)
५०० खाटांचा नवीन मेडिसीन ब्लॉक
पॉवरग्रिडच्या सीएसआर निधीतून १.२५ कोटींचे प्रतीक्षालय

सुवर्णमहोत्सव सोहळा २२ डिसेंबरला 
येत्या २२ ते २४ डिसेंबरदरम्यान मेयो रुग्णालयाचा सुवर्णमहोत्सवी सोहळा होत आहे. २२ डिसेंबरला विविध शैक्षणिक व सांस्किृतक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २३ डिसेंबरला या सोहळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहूणे असतील. देश-विदेशातील विद्यार्थी यावेळी मेयोतील विद्यमान विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.  

‘एमआरआयचा मार्ग मोकळा - डॉ. सोनपुरे
भारतीय वैद्यक परिषदेतर्फे दरवर्षी मेयोत ‘एमआरआय, डीएसए’ उपकरण नसल्याची त्रुटी काढते. याशिवाय सीटी स्कॅन वारंवार बंद पडते. याचा रुग्णांसह प्रशासनालाही मनस्ताप होतो. मेयोने वारंवार वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत सीटी स्कॅन, एमआरआय आणि डीएसए या तिन्ही उपकरणांसाठी सात दिवसांत २५ कोटी निधीच्या खर्चाला मंजुरी दिली आहे, असे मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. के. आर. सोनपुरे यांनी यावेळी सांगितले.  

या विषयात सुपर स्पेशालिटी 
इंडोक्रोनोलॉजी,
प्लास्टिक सर्जरी,
नेफ्रोलॉजी, 
यूरो सर्जरी 
गॅस्टोइंटोलॉजी, 
आँकोलॉजी, 
पेडियाटीक सर्जरी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur vidarbha news poor people superspeciality service in meyo hospital