विवाहितेचे अंबाझरी गार्डनमध्ये विषप्राशन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

नागपूर - विवाहितेशी जवळीक साधून काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे महिलेने अंबाझरी गार्डनमध्ये विष प्राशन केले. तिला बेशुद्धावस्थेत मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी युवकाविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. राहुल ऊर्फ सुधीर सहारे असे आरोपी युवकाचे नाव आहे. प्रियंका पवन धुरिया (वय २६, रा. रामेश्‍वरीनगर) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे.

अंबाझरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका (२६) हिचा पवन धुरिया (वय ४१) यांच्याशी चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. सुशिक्षित असलेल्या प्रियंकाने पतीला कॉम्प्युटर कोर्स शिकण्याची इच्छा व्यक्‍त केली. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपूर्वी प्रियंकाने एमएससीआयटीचा कोर्स लावला होता. शिक्षण घेत असताना सहकारी असलेल्या राहुल सहारे या युवकाशी ओळख झाली. तीन महिने सोबत शिक्षण घेतल्यामुळे दोघांत मैत्री झाली. दोघांनीही एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले. दोघांत घट्ट मैत्रिपूर्ण संबंध निर्माण झाले. यादरम्यान राहुलने प्रियंकाचे त्याच्यासोबत काही फोटो काढले. ते फोटो दाखवून तो ब्लॅकमेल करीत होता. संसार तुटण्याच्या भीतीमुळे प्रियंका घाबरत होती. त्याचाच फायदा घेऊन राहुल तिला मानसिक त्रास देत होता. तिला चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकीसुद्धा दिली. राहुलने तिला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने नकार देताच त्याने तिचे फोटो तिच्या भावाच्या व्‍हॉसॲपवर पाठवले. ते फोटो पतीला आणि फेसबुकवर अपलोड करण्याची धमकी दिली. त्यामुळे संसार उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आला होता. त्यामुळे ती १८ सप्टेंबरला क्‍लासला जात असल्याचे सांगून अंबाझरी गार्डनमध्ये गेली. तिने सोबत विषाची बाटली नेली होती. सकाळी साडेअकराला तिने विष प्राशन केले. त्यानंतर पतीला फोन केला. राहुलच्या कृत्याबाबत सर्व हकीकत पतीला सांगितली आणि विष प्राशन करून आत्महत्या करीत असल्याची माहिती दिली. त्यामुळे पती लगबगीने गार्डनमध्ये पोहोचला. प्रियंकाला मेडिकलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले.

Web Title: nagpur vidarbha news posion drink women