पोस्टर बॉइजने फासला आवाहनाला हरताळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त जाहिरातबाजी करू नये, असे आवाहन केल्यानंतरही काही पोस्टर बॉइजने त्यांच्या वाढदिवसाचे मोठमोठे फ्लेक्‍स बॅनर शहरात लावले आहेत. मुख्यमंत्र्यांचा शब्द राखला जावा, याकरिता अतिउत्साही कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडत आहे. 

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त जाहिरातबाजी करू नये, असे आवाहन केल्यानंतरही काही पोस्टर बॉइजने त्यांच्या वाढदिवसाचे मोठमोठे फ्लेक्‍स बॅनर शहरात लावले आहेत. मुख्यमंत्र्यांचा शब्द राखला जावा, याकरिता अतिउत्साही कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडत आहे. 

शेतकऱ्यांची स्थिती चांगली नसल्याने वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. वाढदिवसावर होणारा खर्च शेतकऱ्यांसाठी खर्च करावा, अशी सूचना दिली आहे. वाढदिवसासाठी कार्यकर्त्यांनी बॅनर, फ्लेक्‍स व वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती प्रकाशित करू नये,  असे निर्देश दिले आहेत. एवढेच नव्हे तर यावर होणारा खर्च मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीला देण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु, या आवाहनाकडे दुर्लक्ष करून कार्यकर्त्यांनी  मुख्यमंत्र्यांचे मोठमोठे फ्लेक्‍स शहरात लावले आहेत. भाजपचे नगरसेवक भूषण शिंगणे यांनी मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असलेले फ्लेक्‍स पश्‍चिम नागपुरात लावले आहेत. भूषण शिंगणे मुख्यमंत्र्यांच्या विश्‍वासातील मानले जातात. त्यांचे छायाचित्र या फ्लेक्‍सवर झळकत आहे. 

महामृत्युंजय यज्ञ
काही कार्यकर्त्यांनी शहरात मुख्यमंत्र्यांच्या दीर्घ आयुष्याची कामना करण्यासाठी यज्ञ करण्याचे ठरविले आहे. गेल्या काही महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस तीनवेळा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले. यामुळे भाजयुमोचे विक्की पटले यांनी येत्या २२ जुलैला महामृत्युंजय यज्ञ करण्याचे ठरविले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार त्यांचा वाढदिवस साधेपणानेच साजरा केला जाणार आहे. दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. मात्र, माझ्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी परस्पर फ्लेक्‍स लावले आहेत. त्यावर माझा फोटोही आहे. कार्यकर्त्यांना कसे रोखणार, हा प्रश्‍न आहे. 
- भूषण शिंगणे, नगरसेवक व प्रन्यासचे विश्‍वस्त

Web Title: nagpur vidarbha news poster boys flex