पाकिस्तानमुळे नासतेय पंजाब राज्‍य - केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर

शंकरनगर - डॉ. अलका सरमा यांना पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर. शेजारी उपस्थित विजया रहाटकर, खासदार अजय संचेती, ॲड. मा. म. गडकरी, रवी कालरा, विकास झाडे आदी.
शंकरनगर - डॉ. अलका सरमा यांना पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर. शेजारी उपस्थित विजया रहाटकर, खासदार अजय संचेती, ॲड. मा. म. गडकरी, रवी कालरा, विकास झाडे आदी.

नागपूर - भारताकडून युद्धात हरण्याची भीती असलेल्या पाकिस्तानने पंजाबमार्गे अमली पदार्थांचे नेटवर्क उभारले. परिणामत: प्रत्येक घरातून एकतरी सैनिक देणाऱ्या पंजाबमधील तरुण आज देशासाठी बंदुकीऐवजी ड्रग हाती घेत आहे. इतकेच नव्हे, तर ईशान्येकडील राज्ये, हिंदी ते अरब समुद्र हे अमली पदार्थांचे ‘जंक्‍शन’ बनल्याची धक्कादायक माहिती रविवारी (ता. २३) केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. 

सी. मो. झाडे फाउंडेशनच्या डॉ. सत्यनारायण नुवाल व्यसनमुक्ती केंद्राच्या डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. संपूर्ण भारताला चारही दिशांनी अमली पदार्थांचा विळखा घालण्यात येत आहे. यात हैदराबादेतील नायजेरियन युवक तसेच बांगला देशातून आलेल्या घुसखोरांचादेखील समावेश आहे. आजतागायत भारताने पाकिस्तानला प्रत्येक युद्धात हरविले. त्याचा वचपा भारतीय युवकांना अमली पदार्थांचे व्यसन लावून घेण्यात येत असल्याचा दावा अहीर यांनी केला. आजघडीला दोन कोटी बांगला देशी भारतात राहतात. यापैकी तब्बल ४८ लाख पश्‍चिम बंगाल आणि आसाममध्ये आहेत. 

घुसखोरी करून भारताला पोखरण्याची समस्या गंभीर आहे. यासाठी कठोर पावले उचलण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. या वेळी आसाममधील समाजसेवक तसेच माजी आमदार डॉ. अलका सरमा यांना डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात आले.  सत्काराला उत्तर देताना डॉ. सरमा यांनी ईशान्येकडील राज्यांना आपले मानत, समजून घेण्याची भावना व्यक्त केली.

या भागात सरकार कार्य करत आहे. परंतु, ते पुरेसे नसून लोकांचा लोकांशी संवाद अत्यावश्‍यक असल्याचे त्या म्हणाल्या. स्वत:च्या ओळखीबाबत असलेले त्यांच्या मनातील प्रश्‍नचिन्ह दूर होण्यासाठी संवाद वाढायला हवा. ईशान्येकडील राज्यांच्या सीमा या आंतरराष्ट्रीय सीमा आहेत. त्यांचे महत्त्व आतातरी समजायला हवे, असे सांगत त्यांनी विद्यमान मोदी सरकार देश जोडण्याचे कार्य करत असल्याचे गौरवोद्‌गार काढले. 

तत्पूर्वी, खासदार अजय संचेती, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ. विजया रहाटकर, महापौर नंदा जिचकार, ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार, द अर्थ सेव्हिअरचे संस्थापक रवी कालरा यांनी मनोगत व्यक्त केले. फाउंडेशनचे अध्यक्ष विकास झाडे यांनी प्रास्ताविक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com