मेगाब्लॉकमुळे डझनभर रेल्वेगाड्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

नागपूर - दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या खडगपूर यार्डचे आधुनिकीकरण, तिसऱ्या मार्गाची अंतर्गत जोडणी आणि रेल्वेस्थानकावरील अन्य कामांसाठी १५ ते १९ नोव्हेंबरदरम्यान  सलग तीन दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी डझनभराहून अधिक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याचा समावेश आहे.

नागपूर - दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या खडगपूर यार्डचे आधुनिकीकरण, तिसऱ्या मार्गाची अंतर्गत जोडणी आणि रेल्वेस्थानकावरील अन्य कामांसाठी १५ ते १९ नोव्हेंबरदरम्यान  सलग तीन दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी डझनभराहून अधिक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याचा समावेश आहे.

१५ आणि १६ नोव्हेंबर रोजी कुर्ला-हावडा एक्‍स्प्रेस, १७ नोव्हेंबर रोजी हावडा-मुंबई एक्‍स्प्रेस, पारेबंदर-संतरागाछी एक्‍स्प्रेस, कुर्ला-शालीमार एक्‍स्प्रेस, संतरागाछी-राजकोट एक्‍स्प्रेस, १७  व १८ नोव्हेंबर रोजी हावडा-कुर्ला एक्‍स्प्रेस, १८ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद-हावडा एक्‍स्प्रेस, मुंबई -हावडा गीतांजली एक्‍स्प्रेस, संतरागाछी-पुणे स्पेशल, १९ नोव्हेंबर रोजी शालीमार-कुर्ला  एक्‍स्प्रेस, संतरागाछी-पोरबंदर एक्‍स्प्रेस, हावडा-अहमदाबाद एक्‍स्प्रेस आणि राजकोट-संतरागाछी स्पेशल गाडी रद्द करण्यात आली आहे. 

याशिवाय १९ नोव्हेंबर रोजी कुर्ला-शालीमार एक्‍स्प्रेस टाटानगर स्थानकावर थांबेल आणि तिथूनच कुर्लाच्या दिशेने रवाना होईल. त्याच दिवशी धावणारी गीतांजली एक्‍स्प्रेस ५ तास १० मिनिटे उशिरा सुटेल. 

१८ नोव्हेंबर रोजी सुटणारी साईनगर शिर्डी- हावडा सुपरफास्ट एक्‍स्प्रेस ३ तास ०५ मिनिटे उशिरा रवाना होईल. 

इतवारी-रायपूर पॅसेंजरचा खोळंबा
रायपूर रेल्वेस्थानकावर रेल्वेमार्गाच्या कामासाठी दर १५ दिवसांनी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे इतवारी-रायपूर पॅसेंजर गाडी सहा दिवस रद्द करण्यात आली आहे. ५, १९,२६ नोव्हेंबर आणि १०,१७, ३१ डिसेंबर रोजी रायपूर-इतवारी पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. परिणामी दुसऱ्या दिवशी इतवारी-रायपूर पॅसेंजर रद्द राहील.

छत्तीसगढ एक्‍स्प्रेस धावणार हळुवार
रायपूर रेल्वेस्थानकावरील कामांमुळे रेल्वेगाड्या प्रभावित होणार आहे. या काळात प्रवाशांच्या सुविधेसाठी अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्‍स्प्रेस रायपूर ते बिलासपूरदरम्यान पॅसेंजर बनून हळुवार धावेल आणि दरम्यान येणाऱ्या प्रत्येक रेल्वेस्थानकावर थांबा घेईल.

Web Title: nagpur vidarbha news railway cancel by megablock