राजे लक्ष्मणसिंग भोसले यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

नागपूर - भोसले घराण्याचे वंशज तसेच माजी खासदार स्व. तेजसिंगराव राजे भोसले आणि माजी खासदार स्व. चित्रलेखा भोसले यांचे ज्येष्ठ सुपुत्र राजे लक्ष्मणसिंग भोसले (वय ५१) यांचे शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. रविवारी (ता. २०) दुपारी दोनला नवी शुक्रवारी येथील काशीबाई राजघाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. राजे लक्ष्मणसिंग भोसले शहरातील प्रसिद्ध उद्योजक होते. नागपूरच्या मॉस्कोट होंडा कंपनीचे ते संचालकसुद्धा होते.

नागपूर - भोसले घराण्याचे वंशज तसेच माजी खासदार स्व. तेजसिंगराव राजे भोसले आणि माजी खासदार स्व. चित्रलेखा भोसले यांचे ज्येष्ठ सुपुत्र राजे लक्ष्मणसिंग भोसले (वय ५१) यांचे शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. रविवारी (ता. २०) दुपारी दोनला नवी शुक्रवारी येथील काशीबाई राजघाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. राजे लक्ष्मणसिंग भोसले शहरातील प्रसिद्ध उद्योजक होते. नागपूरच्या मॉस्कोट होंडा कंपनीचे ते संचालकसुद्धा होते. त्यांच्यापश्‍चात पत्नी इंदिरा राजे भोसले, मुली अग्रेजा राजे भोसले व संयुक्ता राजे भोसले, तीन बहिणी, भाऊ राजे मानसिंग भोसले असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. रविवारी दुपारी दोनला महाल येथील भोसले राजवाडा येथून त्यांची अंत्ययात्रा निघेल.

Web Title: nagpur vidarbha news raje laxmansing bhosale death

टॅग्स