निवासी डॉक्‍टरांना निलंबनाचा डोस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

आंदोलनकाळात मेडिकलमध्‍ये ५० मृत्यू, रात्री फुगतो मृतांचा आकडा 
नागपूर - मेडिकलमध्ये सामूहिक आंदोलन सुरू असताना मंगळवारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे  यांनी निवासी डॉक्‍टरांना विभागप्रमुखांमार्फत कारवाईची नोटीस जारी केली. रात्री उशिरा अधिष्‍ठतांनी निलंबनाचा डोस दिला. मात्र, यासंदर्भात जोपर्यंत वरिष्ठांकडून कारवाई करण्याचे आदेश येत नाही, तोपर्यंत अधिष्ठाता कारवाई करू शकत नसल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे डॉक्‍टरांच्या सामूहिक आंदोलनामुळे संप चिघळण्याची शक्‍यता आहे. 

तीन दिवसांपासून निवासी डॉक्‍टर सामूहिक रजेवर आहेत. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात तपासणीशिवाय कोणतेही उपचार होत नसल्याचे चित्र आहे. 
वॉर्ड रिकामे होत असून, परिचारिका वॉर्डात सेवा देत आहेत.

२४ तासांत अवघे १५२ रुग्ण
मेडिकलमध्ये सर्जरी आणि मेडिसीन विभाग अशा दोन स्वतंत्र कॅज्युअल्टी आहेत. इतर दिवशी दोन्ही कॅज्युल्टीत तीनशेवर रुग्णांवर उपचार केल्याची नोंद होते. परंतु, दोन दिवसांपासून कॅज्युल्टीतील उपचाराचा आकडा खाली घसरला आहे. २४ तासांत अवघ्या १५२ रुग्णांनी  उपचार घेतला.

Web Title: nagpur vidarbha news residential doctor strike