भारतात होणार ‘सी प्लेन’ची चाचणी - अशोक गजपती राजू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

नागपूर - जपानी कंपनीने सी प्लेन तयार केले असून, चाचणीसाठी भारताची निवड केली आहे. कंपनीने परवानगीसाठी भारतीय नागरी उड्डयन मंत्रालयाशी संपर्क साधला. या चाचणीत सुरक्षेची चाचपणीही करण्यात येईल. पूर्व किनारा किंवा इतर किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात  येईल, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

एअर इंडियाच्या मिहानमधील एमआरओमध्ये पहिल्यांदाच स्पाईट जेट या खासगी कंपनीच्या विमान दुरुस्ती सेवेच्या लोकार्पणासाठी शहरात आले असताना ते बोलत होते. राजू म्हणाले, एअर इंडिया सध्या तोट्यात आहे. देशातील हवाई वाहतुकीतील ही सर्वांत मोठी कंपनी आहे. या कंपनीला तोटातून बाहेर काढण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. 

कंपनीबाबत निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठित केली. यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री पीयूष गोयल, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि नागरी उड्डयनमंत्र्यांचा समावेश आहे. या समितीतर्फे एअर इंडियाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी विविध सूचना मागविण्यात येत आहेत. प्रेझेंटेशनही सादर केले जात आहेत. कंपनीचा तोटा कमी करण्यासाठी समितीचे सदस्य प्रयत्न करीत आहेत. अनेक उपयुक्त सूचनांचा विचार केला जाणार आहे. आलेल्या सूचनांवर एकमत झाल्यावरच त्यावर अंमलबजावणी केली जाईल. उपयुक्त सूचनांकडे दुर्लक्ष होणार नाही. एअर इंडियाच्या एमआरओला लागणारे कुशल अभियंते आणि तंत्रज्ञासाठी नागपुरात बोइंगने अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याला केंद्र सरकारचे सहकार्य राहील. या एमआरओमधून देशी-विदेशी विमानांच्या दुरुस्तीची  सोय उपलब्ध होण्यासाठी एमआरओचा विकास करावा लागणार असल्याचे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.

Web Title: nagpur vidarbha news sea-plane test in india