सरासरी २०० मुलांमध्ये आढळते एक स्वमग्न मूल - डॉ. चंद्रशेखर मेश्राम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

नागपूर - स्वमग्नता (ऑटिझम) मेंदूच्या वाढीतील विस्कळीतपणा आहे. ही एक अवस्था असून, ती आनुवंशिकही आहे. सरासरी दोनशे मुलांमध्ये एकाला हा विकार होण्याची शक्‍यता आहे. स्वमग्न चिमुकल्यांमध्ये मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण चौपट आढळते. 

दोन एप्रिल जागतिक ‘स्वमग्नता दिन’ (वर्ल्ड ऑटिझम डे) म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने १९८९ साली हा दिवस जाहीर केला. ऑटिझम किंवा स्वमग्नता म्हणजे स्वत:तच रमून राहण्याची तीव्र स्वाभाविक वृत्ती. स्वमग्न मुले इतर मुलांसारखी खेळतात, उड्या मारतात,  किंबहुना इतर मुलांपेक्षा कधी कधी जास्त उंचावर चढतात, उड्या मारतात, ॲक्‍टिव्ह असतात. 

काही मुले वेगळे वागत आहेत असे आपल्याला जाणवते. हाक मारली तरी लक्ष न देणारे, बोटाने खाणाखुणा न करणारे, खूप प्रकाश पाहिल्यावर गोंधळणे, अशा मुलांना ‘स्वमग्न’ मुले ही एक अवस्था आहे. या मुलांचा इतरांशी होणारा संवाद आणि सामाजिक वर्तणुकीवर फार तीव्र आणि व्यापक परिणाम होतो. चित्रकला, संगीत किंवा खेळ यापैकी कोणत्या तरी एकाच गोष्टीची आवड निर्माण होते. नॉर्मल मूल जर एखाद्या खेळाबरोबर जास्तीत जास्त एखादा तासच खेळू शकले तर स्वमग्न असलेले मूल तोच खेळ खेळण्यात धन्यता मानते.

स्वमग्नतेची लक्षणे
 दोन-तीन वर्षांनंतरच बोलण्यास सुरवात होते.
 सामान्य मुलांमध्ये मिसळण्याचा कल दिसत नाही .
 विचित्र खेळ खेळताना ते रमतात.
 एका जागेवर न थांबण्याच्या सवयी
 तीव्र प्रकाशाला घाबरणे

पालकांनी लक्ष द्यावे
 लवकर निदान महत्त्वाचे आहे.
 पालकांनी या क्षेत्राती तज्ज्ञांची मदत घेऊन मुलांवर संस्कार करावे
 पालकांनी याबद्दलची जास्तीत जास्त माहिती मिळविणे.
 मुलांच्या विकासातील दोष पालकांनी मान्य करावा.
 संवेदना, भाषा यासंदर्भात विशेष तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देणे.
-आवड असलेल्या क्षेत्रात अशा मुलांना घडवावेत.

प्रमाणपत्राची सोय 
ऑटिझमची आता स्वतंत्र नोंद ठेवली जाते. ‘ऑटिझम असल्याचा दाखलाही दिला जातो. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने यासंदर्भातील आदेश दोन वर्षांपूर्वी काढले. जिल्हा रुग्णालयातील मेडिकल बोर्डाकडून अशा मुलांच्या तपासणीनंतर पाच वर्षांसाठी आणि जे कायमचे ‘ऑटिझम’आहेत त्यांना कायम उल्लेख करून दाखले दिले जातात. 

जनजागृती गरजेची
स्वमग्नता या विकारावर जगभर जनजागृती सुरू आहे. आपल्या देशात स्वमग्नता या अवस्थेत असलेल्या मुलांची संख्या भरपूर आहे. समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे. वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्राच्या अभ्यासक्रमात अजूनही स्वमग्नता याबद्दल पुरेसा सखोल अभ्यास नाही. कुठलेली वैद्यकीय तत्काळ उपचार अस्तित्वात नाहीत. प्रशिक्षणातून आणि संस्कारातून विकास साधणे शक्‍य आहे. असे जागतिक ट्रापिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.

Web Title: nagpur vidarbha news Selfishness Day chandrashekhar meshram