विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

नागपूर - कौटुंबिक कलहाला कंटाळून नागपुरातील वसतिगृहात राहणाऱ्या एका बी.एड.च्या विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. बाळू आडे (वय २७, रा. सोजना, ता. मानोरा, जि. वाशीम) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

बाळू देवीदास आडे हा मूळचा वाशीमचा असून त्याचे वडील पोलिस दलात नोकरीला आहेत. तो शिक्षणासाठी गेल्या दोन वर्षांपासून नागपुरात राहतो. सध्या तो अंबाझरीमधील लॉ कॉलेज चौकातील विधी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होता. गेल्या आठ दिवसांपासून तो तणावात होता. त्याने मित्राला कौटुंबिक कलहाला कंटाळल्याचे सांगितले होते. आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास रूम नं. १७० मध्ये विष प्राशन केले. दुपारी चार वाजताच्या सुमारास काही विद्यार्थी त्याच्या रूमकडे गेले. बाळूला आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यांनी अन्य काही विद्यार्थ्यांना आवाज देऊन दरवाजा उघडला. त्यावेळी बाळू निपचित पडलेल्या अवस्थेत दिसला. विद्यार्थ्यांनी लगेच त्याला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

यापूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न
बाळू हा कौटुंबिक वादाला कंटाळा होता. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपूर्वीही त्याने खेडेगावी हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला होता. आज पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात त्याचा जीव गेला.

Web Title: nagpur vidarbha news student suicide