सुपरमध्ये ‘भूल’, खासगीत शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

नागपूर - ऑटोचालक, खासगी डॉक्‍टरांचे एजंट हजार, पाचशे रुपयांसाठी मेडिकलच्या रुग्णांना खासगी रुग्णालयात पळविण्याचा प्रकार नेहमीचाच. परंतु, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून चक्क डॉक्‍टरांनीच हृदयविकाराच्या रुग्णांची तस्करी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  गेल्या काही महिन्यात ८३ रुग्णांना पळविण्यात आल्याचे पुरावे आढळून आलेत.

रुग्णांच्या या तस्करीमुळे सुमारे २२ लाखांचा फटका बसला आहे. ही बाब पुढे आल्यानंतर रुग्ण पळविणारे  दोन डॉक्‍टर विभागीय चौकशीच्या भोवऱ्यात अडकण्याचे संकेत आहेत. 

खासगीतील उपचार गरिबांच्या आवाक्‍यात नसल्याने सुपरकडे धाव घेतात. दिवसाला हजारावर रुग्णांची नोंदणी होते. हृदयरोग (एन्जिओप्लास्टी), गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलाजी, सीव्हीटीएस विभाग गरिबांच्या आजारांवर वरदान ठरले. सुपरमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या मदतीतून निदान, उपचार मोफत होतात. ओपन हार्टसह किडनी प्रत्यारोपण तसेच एन्जिओप्लास्टीसाठी लाखामोलाची मदत उपलब्ध होते. हा निधी सुपरच्या तिजोरीत जमा होतो. परंतु, याचा गैरफायदा घेत चक्क डॉक्‍टरांनीच रुग्णांची तस्करी करण्याचा धंदा सुरू आहे. या प्रकरणाची तक्रार भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निदर्शनास आणून  दिली.

संबंधित मंत्रालयाला पुराव्यांसह तक्रार केली. सुपरमधून पळविण्यात आलेल्या ८३  रुग्णांवर शहरातील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे पुढे आले. याची दखल घेत मंत्रालयाने रुग्ण पळविणाऱ्या सुपरच्या डॉक्‍टरांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याशी संपर्क साधला असता, विभागीय चौकशीच्या वृत्ताला दुजोरा दिला. 

अशी होते पळवापळवी
सुपरमध्ये रुग्ण उपचारासाठी आला की, बाह्यरुग्ण विभागात नोंदणी होते. उपचारापूर्वी निदान केले जाते. निदानात शस्त्रक्रिया गरजेची असल्याचे समजाच महात्मा फुले जनआरोग्य योजनेत नोंदणी होते. सुपर ‘अ’ दर्जाचे असल्याने शस्त्रक्रियेसाठी जादा निधी मंजूर होतो. रुग्णांची केस मंजूर  झाली की, नातेवाइकांशी संगनमत करून तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे भासवले जाते. सुपरमध्ये वेटिंग असल्याचे दाखवले जाते.

रुग्णांच्या संमतीने खासगीत रेफर करण्याचा डाव रचला जातो. या रुग्णांच्या शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात सुपरचेच संबंधित दोन डॉक्‍टर करीत असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहसहसंचालकांनी केलेल्या चौकशीतून पुढे आली. जनआरोग्य योजनेत मंजूर असल्याने सुपरमध्ये निदानाचे शुल्क पडत नाही. निदानासह दीड दोन लाखांचा मंजूर निधी सुपरच्या तिजोरीत येत नाही. फुले जनआरोग्यातून मिळणारा निधीही खासगीकडे वळता केला जातो. खासगी रुग्णालय ब दर्जाचे असूनही अ दर्जाच्या सुपरमधून रुग्ण आल्याने जादाचा मंजूर निधी खासगीच्या घशात जात आहे.

Web Title: nagpur vidarbha news super speciality hospital