काँग्रेस आज पाळणार काळादिन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

नागपूर - नोटाबंदीच्या निर्णयाला उद्या, ८ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. हा दिवस शहर काँग्रेसने शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काळा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्त टेलिफोन एक्‍स्चेंज चौकात दुपारी तीन वाजता जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता. त्यामुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप

सहन करावा लागला. अद्याप या निर्णयातून कुणीही सावरले नाही, असा आरोप करीत शहर काँग्रेसने आंदोलनाची तयारी केली आहे. या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, माजी आमदार, नगरसेवक, पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती कार्यकारी सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार यांनी दिली.

Web Title: nagpur vidarbha news today is black day by congress