तूरडाळ प्रथमच नीचांकीवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

उत्पादन वाढले - सामान्यांच्या जेवणात दिसू लागले वरण 
नागपूर - भरघोस उत्पादन, डाळीची केलेली आयात आणि कमी झालेल्या  मागणीमुळे तूरडाळीच्या भावात विक्रमी घट झाली आहे. पाच वर्षांत प्रथमच तूरडाळीचे दर नीचांकीवर आले आहेत. २०१२ मध्ये डाळीचे भाव ७० ते ७५ प्रतिकिलो होती. यंदा त्याच डाळीचा दर ६५ ते ७० रुपये प्रतिकिलो आहे. सरकारकडे डाळीचा मोठा साठा असल्याने आगामी काळात दरवाढीची शक्‍यता कमीच आहे. 

सर्वसामान्यांसह सर्वांच्याच ताटातील विशेष व आवश्‍यक पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूरडाळीचे भाव मागील दोन वर्षांपासून गगनाला भिडले आहेत. १७० ते २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत मजल मारलेल्या तूरडाळीच्या भावाने जनसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडले होते. नोव्हेंबरनंतर नोटाबंदीच्या फटक्‍यानंतर बाजारपेठेत आर्थिक उलाढाल कमी झाली. डाळीची मागणीही घटली. 

नागपूर जिल्ह्यात १५० पेक्षा अधिक दाल मिल आहेत. नोटाबंदीमुळे अनेक दालमिल संचालकांनीही गरज असेल तेवढीच तूर खरेदी करणे सुरू केले. त्यामुळे तुरीची आवक अधिक आणि मागणी कमी झाल्याने हमी भावापेक्षा तुरीची कमी दरात व्यापारी व दलाल खरेदी करीत होते. दरम्यान, परदेशातून तूरडाळ मोठ्या प्रमाणात भारतात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तुरीची खरेदीवर अंकुश आणला. बाजार समितीत तुरीची आवक वाढली आणि खरेदीदार कमी झाल्याने ३२०० रुपये क्विंटलने तुरीची खरेदी होऊ लागली होती. तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्यानंतर शासनाने ५२०० हमीभावाने तूरखरेदी करण्याची तंबी दिली. परिणामी, व्यापाऱ्यांनी तूरखरेदीच बंद केल्याने सरकारी साठ्यात वाढ झाली. त्यानंतरही भावात घसरण सुरूच होती. दर कमी झाल्याने आता सर्वसामान्य नागरिकांच्या जेवणात वरण दिसू लागले आहे.

वाढलेले उत्पादन आणि आयात केलेल्या डाळीमुळे साठा वाढला. पाच वर्षांच्या तुलनेच यंदा तूरडाळीच्या दराने नीचांक गाठला आहे. 

- प्रताप मोटवानी, धान्य व्यापारी

Web Title: nagpur vidarbha news turdal rate decrease