राष्ट्रसेविका समितीच्या उषाताई चाटी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

नागपूर - राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका उषाताई चाटी (वय 91) यांचे गुरुवारी दुपारी चार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा धंतोलीतील देवी अहल्या मंदिरातून शुक्रवारी (ता. 18) सकाळी साडेदहा वाजता निघणार आहे.

उषाताई चाटी या 1946 ते 2006 या काळात समितीच्या प्रमुख संचालिका होत्या. त्या मूळच्या भंडारा येथील आहेत. त्यांनी बीए, बीटीपर्यंत शिक्षण घेतले. 1948 मध्ये गुणवंत चाटी यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर त्या नागपूरला आल्या. दादीबाई देशमुख हिंदू मुलींच्या शाळेत दीर्घकाळ शिक्षिका होत्या. शाळेतील वाग्मिता विकास समितीच्या त्या 36 वर्षे अध्यक्ष होत्या. सुमधूर आवाज, मृदू व्यक्तिमत्त्व हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. वैमनस्य मिटवून अनेक परिवारात सुसंवाद निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. उत्तर प्रदेशात प्रदीर्घ काळ त्यांनी राष्ट्रसेविका समितीचे काम सांभाळले. त्यांच्या मार्गदर्शनात 2005 मध्ये खापरी येथे झालेले सेविकांचे संमेलन आजही अनेकांच्या लक्षात आहे. मुंबईच्या आर. जी. फाउंडेशन आणि लखनौच्या भाऊराव देवरस न्यासने या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पुरस्कार प्रदान केला होता.

Web Title: nagpur vidarbha news ushatai chati death