मीटर रीडिंग एजन्सीवर ‘वॉच’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

नागपूर - महावितरणतर्फे मीटर रीडिंग एजन्सीवर ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे. मीटर रीडिंगबाबत क्रॉसचेक करून महिती योग्य असल्याची खातरजमा करण्यात येईल. रीडिंग सदोष आढळल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश महावितरण प्रशासनाने दिले आहेत. 

नागपूर - महावितरणतर्फे मीटर रीडिंग एजन्सीवर ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे. मीटर रीडिंगबाबत क्रॉसचेक करून महिती योग्य असल्याची खातरजमा करण्यात येईल. रीडिंग सदोष आढळल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश महावितरण प्रशासनाने दिले आहेत. 

सदोष मीटर रीडिंगमुळे वीजग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन महावितरणने उपाययोजनात्मक पावले उचलली आहेत. मीटर रीडिंग एजन्सीजने घेतलेल्या रीडिंगपैकी पाच टक्के रीडिंगची पुनर्तपासणी त्याच दिवशी करून पर्यवेक्षण करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहे. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती आणि गोंदिया या विदर्भातील पाचही परिमंडळात मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात येत आहे. 

एजन्सीने नादुरुस्त मीटर म्हणून नोंदविलेल्या मीटरची तपासणी ४८ तासांच्या आत करून सदर मीटर नादुस्त आढळल्यास ते त्वरित बदलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

महावितरणने मोबाइल ॲपद्वारे वीजमीटर रीडिंगची प्रणाली विकसित केली आहे. पूर्वीच्या तुलनेत मीटर रीडिंगची पद्धती अधिक सोयीस्कर व सोपी झालेली आहे. रीडिंगमध्ये अचूकताही आलेली आहे. पण, मीटर रीडिंग एजन्सीजद्वारे अनेक ठिकाणी सदोष रीडिंग घेतले जात आहे. या सर्व कामांवर वेळोवेळी देखरेख करण्याची जबाबदारी प्रादेशिक संचालक यांच्या कार्यालयाला देण्यात आली आहे.

रोज रीडिंगची तपासणी
महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांकडून रोज प्रत्यक्ष पाच टक्के मीटर रीडिंगची तपासणी करून एजन्सीजने घेतलेल्या रीडिंगचे पर्यवेक्षण सुरू आहे. आयटीआय अप्रेंटिस आणि आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा समूह तयार करून बिलिंगसंदर्भात विविध विषयांवर काम करण्यासाठी त्यांचे सहकार्य करण्याच्या सूचनाही संबंधितांना करण्यात आल्या आहेत.

Web Title: nagpur vidarbha news watch on meter reading agency