महिला मनोरुग्णांचे वॉर्ड हाउसफुल्ल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

प्रादेशिक मनोरुग्णालयात खाटा २८० तर भरती २९६

नागपूर - अलीकडच्या सहा महिन्यांत एकूणच मनोरुग्णांचे प्रमाण वाढत आहे. नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात मानसोपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज किमान पाच ते सहा नवे रुग्ण दाखल होत आहेत. विशेष असे की, महिला मनोरुग्णांची संख्या वाढली आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयात महिला मनोरुग्णांच्या भरतीची क्षमता २८० आहे. या खाटा मंजूर आहेत. परंतु, महिला मनोरुग्णांची संख्या २९६ वर पोहोचली आहे. यामुळे वॉर्डात महिला मनोरुग्णांची प्रचंड गर्दी झाली आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्ण क्षमता ९४० आहे. 

पुरुष मनोरुग्णांसाठी ६६० खाटा असून पुरुष मनोरुग्णांसाठी ९ वॉर्ड आहेत. महिला मनोरुग्णांसाठी २८० खाटा मंजूर असून ६ वॉर्ड आहेत. या सहा वॉर्डांत २९६ महिला मनोरुग्ण ठेवण्यात आले आहेत. एका वॉर्डात ५० महिला मनोरुग्ण ठेवण्यात आले असून प्रचंड गर्दी झाली आहे. विशेषतः रक्तदाब वाढणे, झोप न येणे, उदासीनता व काळजी वाढणे, वैफल्य येणे अशाप्रकारची प्राथमिक लक्षणे महिला मनोरुग्णांमध्ये दिसून येत आहेत. त्यातच स्क्रिझोफ्रेनियाच्या रुग्णसंख्येतही वाढ झाल्याचे दिसून येते.

मनोरुग्णालयात दर दिवसाला दोनशेवर मनोरुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात होत असून यातील ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त महिलांची संख्या आहे, असे मानसोपचारतज्ज्ञांच्या माहितीतून तसेच आकडेवारीनुसार सिद्ध झाले आहे. दररोज बाह्यरुग्ण विभागात ९० जण तपासणी व वैद्यकीय उपचारांसाठी येत आहेत.

३० अटेंडंट्‌सवर ३०० महिलांचा भार
मनोरुग्णालयात तीनशेवर महिला मनोरुग्णांची संख्या आहे. एका मनोरुग्णाला सांभाळण्यासाठी एकाचवेळी दोन किंवा तीन परिचरांची गरज आहे. मात्र, ३० महिलांच्या भरवशावर तीन पाळ्यांमध्ये ३०० मनोरुग्ण महिलांना सांभाळण्याचे आव्‍हान पेलणे अशक्‍य आहे. याशिवाय दर दिवसाला तीन ते चार महिला परिचरांची सुटी असते. काही महिला परिचरांना मनोरुग्णांसोबत उपचारासाठी मेडिकलमध्ये पाठवले जाते. अशा बिकट अवस्थेत मनोरुग्णालय अडकले आहे. यामुळेच चौकशीवर चौकशी केल्यानंतरही कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. 

कौटुंबिक समस्या, दुभंगलेली कुटुंबव्यवस्था तसेच स्पर्धेच्या युगात वाढलेल्या ताणतणावामुळे सारे लोक त्रस्त आहेत. महिला अतिशय संवेदनशील असतात. यामुळे त्यांच्या मनावर तुलनेने लवकर परिणाम होतो. चाळिशी-पंचेचाळिशीतील महिला मनोरुग्ण दिसत आहेत.
- डॉ. प्रवीण नवखरे, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर.

Web Title: nagpur vidarbha news women Psychopath ward full