झेडपी मतदारसंघाच्या आरक्षणाची आज सोडत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नागपूर - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मंगळवारला (ता. ३) जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या बचतभवन येथे सर्कलचे आरक्षण निश्‍चित करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सुरू होईल. निवडणुकीस इच्छुकांच्या नजरा या सोडतीकडे लागल्या आहेत. या सोडतीच्या आधारेच जिल्हा परिषदेची धुरा महिलांकडे जाणार की पुरुषांकडे येणार हे निश्‍चित होईल. 

नागपूर जिल्हा परिषदेच्या ५८ जागांसाठी आरक्षण निश्‍चित होणार आहे. यात ५० टक्के आरक्षण महिलांसाठी असणार आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी महिला, पुरुषांसाठी सर्कलचे आरक्षण जाहीर निश्‍चित होईल. ५८ जागांपैकी सर्वसाधारण वर्गात २५ जागा असून १२ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती (एससी) वर्गात १० जागा असून ५ जागा महिलांसाठी, अनुसूचित जमाती (एसटी) वर्गात ७  जागा असून ४ जागा महिला व ओबीसी वर्गासाठी १६ जागा असून ८ जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. 

जिल्हा परिषदेसाठी अनेकजण इच्छुक असून बांधणीही केली आहे. तर अनेक विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या सर्कलमध्ये काम करून तो अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र या सोडतीत सर्कल महिला किंवा आरक्षित वर्गासाठी गेल्यास मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे सर्कलचे आरक्षण कशापद्धतीने निघते, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. या सोडतीच्या आधारेच जिल्हा परिषदेचे राजकारण निश्‍चित होईल.

Web Title: nagpur vidarbha news zp constituency reservation draw