दारूतस्करांना पोलिसांचा आशीर्वाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

नागपूर - शहरातील स्थानिक पोलिस ठाण्यातील काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दारू तस्करांशी साटेलोटे असल्यामुळे लाखोंच्या दारूची चंद्रपूर जिल्ह्यात तस्करी केल्या जात आहे. गुन्हे शाखेने शनिवारी सापळा रचून दहा लाखांची दारू तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

नागपुरातून चंद्रपूरला वाळू वाहतूक करण्याच्या टिप्परमध्ये दहा लाखांची दारू जात होती. गुन्हे शाखेचे एसीपी सोमनाथ वाघचौरे यांनी छापा घालून दिघोरी चौकात वाहनासह ३० लाखांचा माल जप्त केला. 

पोलिसांनी राहुल रमेश न्यायमूर्ती (२८, रा. खैरी, ता. पवनी, जि. भंडारा), संदीप कवडू न्यायमूर्ती (क्‍लीनर) आणि मुख्य आरोपी सचिन रमेश धकाते (२७, रा. चंद्रपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहे. अटकेतील आरोपींनी पोलिस ठाण्यातील काही पोलिसांशी सेटिंग असल्याची कबुली दिल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

इमामवाड्यातील दुकानातील दारू
टिप्परमध्ये ५०० बॉक्‍स दारू आढळली. या दारूची किंमत दहा लाख रुपये आहे. टिप्परमधील दारू इमामवाड्यातील जाटतरोडी परिसरात असलेल्या ज्योती ट्रेडर्समधून आणली होती. मात्र, टीपी पावती पूर्ण भरलेली नव्हती. त्यामुळे इमावाडा हद्दीतून दारूचा एवढा मोठा साठा कसा गेला? याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त केल्या जात आहे.

पोलिस ठाण्याची भूमिका संशयास्पद
इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दहा लाखांची दारू टिप्परमध्ये टाकून नेल्या जाते. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतूनही दारूचा टिप्पर बिना रोकटोकपणे निघून जातो. तसेच हुडकेश्‍वर पोलिससुद्धा या प्रकाराबाबत अनभिज्ञ असतात. हा घटनाक्रम संशयास्पद असून, दारू तस्करीसाठी स्थानिक पोलिस ठाण्याची मूकसंमती असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिस आयुक्‍तांनी या बाबींकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

गुन्हे शाखा अलर्ट
नागपुरातून दारूबंदी जिल्ह्यात लाखोंच्या दारूची तस्करी नेहमी होते. यासोबतच शहरातही चिल्लर विक्रेता घरात दारूचा साठा भरून ठेवतात. या अवैधरीत्या दारू बाळगणाऱ्यावर किंवा तस्करी करणाऱ्यांवर केवळ गुन्हे शाखाच कारवाई करते. स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकारी ‘सेटिंग’ करीत असल्यामुळे अवैध दारू तस्करी रोकण्याची जबाबदारी केवळ गुन्हे शाखेवर आल्याची चर्चा गुन्हे शाखेत होती.

Web Title: nagpur vidarbha police support to wine smuggler