जेव्हा काम मिळते, तेव्हाच चूल पेटते!

नरेंद्र चोरे 
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नागपूर - हाताला काम मिळेल, या आशेने गाव सोडून त्या नागपुरात आल्या.  मोलमजुरीद्वारे मिळणाऱ्या पैशातून मुलांचे भविष्य घडविण्याचे स्वप्न त्यांनी रंगविले. मात्र, नोटाबंदी व रिअल इस्टेटमध्ये असलेल्या मंदीने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. ठिय्यावर दिवसभर ताटकळत बसूनही काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ‘जेव्हा काम मिळते, तेव्हाच घरची चूल पेटते’ अशा शब्दांत मानकापुरातील ठिय्यावरील महिला मजुरांनी आपल्या व्यथा बोलून दाखविल्या. 

गंगानगर झोपडपट्‌टीत राहणारी अनिता पंचवारे म्हणाली, २० वर्षांपूर्वी आम्ही दोघेही मोठ्या आशेने बालाघाटवरून नागपुरात आलो होतो. मोठ्या शहरांमध्ये भरपूर कामे मिळतात, असे आम्हाला सांगण्यात आले होते. दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही. 

मोलमजुरीसाठी दररोज ठिय्यावर येतो. सकाळपासून दुपारपर्यंत दिवसभर मजुरीच्या प्रतीक्षेत बसतो. कधी काम मिळते, कधी  निराशा पदरी पडते. महिन्यातून मोठ्या मुश्‍किलीने दहा ते पंधरा दिवसच हाताला काम मिळते. ट्रॅकवर हमालीचे काम करणाऱ्या पतीचीही माझ्यासारखीच अवस्था आहे. त्यांनाही मजुरीसाठी सारखे हातपाय मारावे लागतात. त्यामुळे घर चालविताना खूपच त्रास होतो. एवढ्या कमाईत मुलांचे शिक्षण करायचे, घराचा किराया द्यायचा की तब्येती सांभाळायच्या, या चिंतेत आमचा संसार सुरू आहे.  

घरची कामे घाईघाईने आटोपून दररोज सकाळी नऊला ठिय्यावर येते. अनेकवेळा दुपार उलटून जाते तरीसुद्धा काम मिळत नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर घराकडे निघून जाते. एक दिवस काम मिळते आणि दोन दिवस घरी बसावे लागते. बिल्डिंग किंवा मोठमोठ्या अपार्टमेंट्‌सच्या बांधकामांवर आमची मजुरी अवलंबून असते. 
- उमेश्‍वरी पाचे, मजूर

मोलमजुरीच्या उद्देशाने काही वर्षांपूर्वी बालाघाटवरून आले. माती-गोट्याचे काम करून पतीला आर्थिक हातभार लावते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून बिल्डिंगची कामे ठप्प आहेत. त्यामुळे ठिय्यावर काम मिळत नाही. ‘कमायेंगे नहीं तो खायेंगे क्‍या.’ महिन्यातून किमान २० ते २५ दिवस काम मिळावे. 
 - कलवंती कावरे

Web Title: nagpur Women laborers suffering

टॅग्स