नागपूरवरून वर्धेत गेल्यानंतर युवकाने घेतले विष; नंतर घेतली नदीत उडी

Nagpur youth commits suicide in Wardha
Nagpur youth commits suicide in Wardha

समुद्रपूर (जि. वर्धा) : नागपूर येथील व्यक्तीने कांढळी येथे येत वणा नदीच्या पात्रात आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. पाच) दुपारी उघडकीस आली. बंडू मारोतराव गिरडकर (रा. न्यू नरसाळा रोड, राजापेठ जि. नागपूर) असे मृताचे नाव आहे.

आज दुपारच्या वेळी उपसभापती योगेश फुसे यांना वणा नदीच्या पात्रात मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्वरित समुद्रपूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाजवळ ग्लास, विषाची व दारूची बाटली आढळून आली.

खिशात नागपूर कानकाटी (कांढळी) पर्यतची तीन डिसेंबरची बसची तिकीट होती. एका चिठ्ठीत त्याचे नाव बंडू मारोतराव गिरडकर (रा. न्यू नरसाळा रोड राजापेठ, नागपूर व भवानी सभागृह २ रा मजला, हिंगणघाट) असे दोन पत्ते लिहिले होते. तर एक चिठ्ठीही सापडली.

यात ‘मी नैराश्यामुळे आत्महत्या करीत आहे’ असे लिहून होते. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हिंगणघाट येथे रवाना केला. पुढील तपास ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात समुद्रपूर पोलिस करीत आहे.

शेतातील उसाला लागली आग; तीन लाखांचे नुकसान

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील वाईमेंढी गावातील शेतकरी आनंदराव सोळंके यांच्या तीन एकर शेतातील उसाला भीषण आग लागली. त्यात काढणीला आलेला ऊस जळल्याने सोळंके यांचे साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. शेतात असलेल्या डीपीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे बोलले जाते. या आगीमुळे सोळंके यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com