esakal | मनोरुग्णालयात दोन मृत्यू, १०२ कोरोनाबाधित

बोलून बातमी शोधा

Corona Virus

मनोरुग्णालयात दोन मृत्यू, १०२ कोरोनाबाधित

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रादेशिक मनोरुग्णालयात कोरोनाचा शिरकाव झाला होता. परंतु, यावर नियंत्रण राखण्यात यश आले होते. मात्र, दुसऱ्या लाटेत मनोरुग्णालय कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. दुसऱ्या लाटेत १०२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सोमवारी (ता.१९) मनोरुग्णालयात अचानक दोन मृत्यू झाल्याने येथील मृत्यूचा आकडा तीन वर पोहचला.

हेही वाचा: 'वयात बसत नसताना फडणवीसांच्या पुतण्याला लसीचा दुसरा डोस मिळालाच कसा?'

दर दिवसाला मनोरुगणालयातून मनोरुग्णांना मेडिकलमध्ये इतर आजाराच्या तपासणीसाठी पाठवण्यात येत होते. मोठ्या प्रमाणात मनोरुग्णांना पाठवण्यात आल्यामुळेच मेडिकलमधून मनोरुग्णालयात कोरोनाचा शिरकाव झाला असावा अशी जोरदार चर्चा येथे आहे. १०२ कोरोनाबाधित आढळल्यामुळे काही दिवसांपूर्वीच मनोरुग्णालयाला कोविड केअर सेंटर घोषित करण्यात आले. येथे सर्व मनोरुग्णांवर कोरोना उपचार सुरू आहेत. इतर सामान्य कोरोनाबाधितांसाठी या कोविड केअर सेंटरमध्ये पाठवता येणार नाही. केवळ मनोरुग्णांसाठीच हे सेटर असल्याची माहिती आहे. सोमवारी झालेल्या दोन मृत्यूंमध्ये एकाचा मृत्यू हा ह्दयविकारामुळे झाला असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. सद्या मनोरुग्णालयात साडेचारशेवर मनोरुग्ण दाखल आहेत. यापैकी १०२ जणांना कोरोना झाला आहे. यामुळे मनोरुग्णालयात भयाचे वातावरण आहे. मात्र, यातील सत्तर टक्के कोरोनाबाधित बरे झाले असल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे.