esakal | मध्य रेल्वेचे ११ कोच कोविड रुग्णांसाठी सज्ज; मनपासोबत संयुक्तपणे करणार उपचार

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेचे ११ कोच कोविड रुग्णांसाठी सज्ज; मनपासोबत संयुक्तपणे करणार उपचार
मध्य रेल्वेचे ११ कोच कोविड रुग्णांसाठी सज्ज; मनपासोबत संयुक्तपणे करणार उपचार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपुरात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेचे नागपूर मंडल मदत करायला समोर आले आहे. मध्य रेल्वे कडून अजनीच्या कंटेनर ‍डेपोमध्ये ११ कोचची रॅक तयार करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका आणि मध्य रेल्वे मिळून येथे १७६ बेड्‌सवर कोविड रुग्णांचा उपचार करणार आहे.

हेही वाचा: नागरिकांनो सावधान! तुमच्या खिशातील नोटा डुप्लिकेट तर नाहीत ना? शंभर, दोनशेंच्या नोटांमध्ये गडबड

बुधवारी (ता. २८ एप्रिल) महापौर दयाशंकर तिवारी, मध्य रेल्वेच्या नागपूर मंडलचे मंडल रेल प्रबंधक रिचा खरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, अतिरिक्त मंडल रेल प्रबंधक जय सिंग, मध्य रेल्वेचे अधिकारी सी.एम.एस. चंपक बिसवास, वरिष्ठ डी.एम.ई. अखिलेश चौबे, ए.सी.एम.एस वैशाली लोंढेकर, वरिष्ठ डी.ई.एन रोहित ठवरे, डी.सी.एम. विपुल सुसकर, मनपा चे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार यांनी कोचेस मध्ये व्यवस्थेची पाहणी केली.

महापौरांनी यावेळी मध्य रेल्वेला कोविड रुग्णांसाठी त्या ठिकाणी विद्युत व्यवस्था करण्याची सूचना केली. नागपूर महानगरपालिकेतर्फे डॉक्टर्स, नर्सेस, ऑक्सिजन, औषधी व जेवणाची ची व्यवस्था करण्यात आली आहे. महापौरांनी सर्व व्यवस्था लवकरात-लवकर पूर्ण करुन रेल्वेच्या कोचेसचा रुग्णांसाठी वापर करण्याची सूचना मनपा प्रशासनाला केली.

हेही वाचा: यवतमाळमधील खासगी कोविड हॉस्पिटलची तोडफोड; हलगर्जीपणाचा आरोप करीत नातेवाईक संतप्त

मध्य रेल्वेकडून ११ कोचेस रुग्णांसाठी व १ कोच डॉक्टर व स्टाफसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वेतर्फे प्रत्येक कोचला नऊ कुलर व सर्व कोचसाठी २२ ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली आहे. रेल्वे कडून कोचेस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

संपादन - अथर्व महांकाळ