नागपूर : केंद्रीय वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या अँटी-इव्हेझन शाखेने तब्बल ११ कोटी १ लाख रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे..विभागाने स्वतः विकसित केलेली गुप्त माहिती प्रणाली व अत्याधुनिक डेटा विश्लेषण साधनांच्या मदतीने ही मोठी फसवणूक उघडकीस आली. मि. राजवीर एंटरप्रायझेस या आस्थापनेने अतुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोणतेही वस्तू किंवा सेवा न घेता बनावट चलनांच्या आधारे ११ कोटी १ लाख रुपयांचा खोटा आयटीसी घेतला..तसे ११ कोटी १७ लाख रुपयांच्या रकमेचे बनावट बिल जारी करून जीएसटीआर दाखल केल्याचे तपासात आढळले. यात वस्तू अथवा सेवांचा कोणताही प्रत्यक्ष पुरवठा नव्हता. चौकशीत अतुल देशमुख यांने स्वतः या फसवणुकीचे सूत्रधार असल्याची कबुली दिली..Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर.त्याने कमिशनच्या स्वरूपात आर्थिक फायदा घेतल्याचेही मान्य केले. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.